फक्त आश्वासन नको, मराठा समाजाला आश्वस्त वाटणारं कुणीतरी पुढं आलं पाहिजे, पंकजांचा रोख कुणाकडे?

फक्त आश्वासन नको, मराठा समाजाला आश्वस्त वाटणारं कुणीतरी पुढं आलं पाहिजे, पंकजांचा रोख कुणाकडे?

पुणे : सरकारने केवळ आश्वासन देऊन थांबता कामा नये. तर मराठा समाजाला आश्वस्त करणारं कुणीतरी पुढे आलं पाहिजे. लीडरशीप पोटातून स्वीकारली पाहिजे, असे सूचक वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलंय. जालनाच्या लाठीहल्ल्याला जबाबदार धरून गृहमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत आहेत. त्यावेळी पंकजा यांच्या सूचक वक्तव्याने त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता, यासंबंधीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. आरक्षण कसं मिळेल, कायद्याच्या चौकटीत आरक्षण कसे बसेल? याचे ठोकताळे शासनाने मांडले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी सरकारमध्ये काम करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना दिल्या.

पंकजा मुंडे यांची ‘शिवशक्ती परिक्रमा यात्रे’ची तिसऱ्या दिवसाची सुरूवात पुण्यातील कार्यकर्त्यांच्या उत्साहपूर्ण स्वागताने झाली. हडपसर येथे स्वागत स्वीकारून त्या जेजुरीकडे रवाना झाल्या. त्याअगोदर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माझ्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. उत्साहात स्वागत होतंय. मलाही त्यामुळे हुरूप येतोय, असं पंकजा म्हणाल्या. त्याचवेळी त्यांनी राज्यातील धगधगत्या मराठा आरक्षण प्रश्नावरही भाष्य केलं.

पुण्यात जाऊन अधिकाऱ्याचं मुस्काट फोडण्याची नितेश राणेंची भाषा, सोडणार नाही म्हणत कर्मचारीही नडले!
मराठा आरक्षणावर बोलताना पंकजा म्हणाल्या…

मराठा आरक्षणाचा धगधगता प्रश्न आहे. आरक्षणासाठी समाज आक्रमक झाला आहे. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीहल्ला केला जो अत्यंत दुर्दैवी होता. घटना घडल्याच्या पहिल्या तासापासून मी याची सखोल चौकशीची मागणी केली होती, आजही माझी मागणी कायम आहे. या घटनेची व्यवस्थित आणि निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी, असं मला वाटतं. तसेच मराठा आरक्षणासाठी फक्त आश्वासन पुरेसं नाही. लीडरशीप पोटातून स्वीकारली पाहिजे. मराठा समाजाला आश्वस्‍त वाटणारं कोणीतरी समोर आलं पाहिजे, असं सूचकपणे बोलताना आरक्षण कसं मिळेल, त्याचा कोटा काय असेल, यासंबंधीचे ठोकताळे मांडले पाहिजेत, असा सल्ला त्यांनी दिला.

जालना लाठीमारामुळे चर्चेत आलेलं गोवारी हत्याकांड अन् मावळ गोळीबार प्रकरणावेळी काय झालेलं? पवारांची कोंडी का होतेय?
विरोधात असताना आरक्षणावर आवाज, सत्तेत असताना गोळ्या- राज ठाकरेंच्या टीकेवर पंकजांचं मौन

विरोधात असताना भाजप मराठा आरक्षणावरून आवाज उठवत होतं. परंतु सरकारमध्ये आल्यावर याच भाजपने मराठा आंदोलकांवर लाठ्या मारल्या, गोळ्या घातल्या, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर केली होती. या टीकेच्या अनुषंगाने पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र मी यावर काय बोलणार, असं सुहास्य वदनाने म्हणत पंकजांनी यावर मौन पाळणं पसंत केलं. तसेच आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणाबाबत तोडगा निघावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

हॉटेलात काम, चळवळीसाठी जमीन विकली, आरक्षणासाठी ३० हून अधिक आंदोलने, मनोज जरांगे पाटील कोण?
मराठा आरक्षणाचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील?

मराठा आरक्षणाचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेऊ शकतील का? असा प्रश्न पत्रकारांनी पंकजांना विचारला. त्यावर त्या म्हणाल्या, आमचं सरकार असताना त्यांनी तो निर्णय घेतला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयामुळे त्यांचा निर्णय अयशस्वी ठरला, पण त्यांनी तो निर्णय घेतला होता.

पंकजांनीही समर्थकांवर उधळली फुलं, जंगी स्वागताने भारावल्या

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here