वडील काँग्रेस सरकारमध्ये राज्यमंत्री, २५० गाड्यांचा ताफा घेऊन लेकाचा ‘मातोश्री’वर पक्षप्रवेश

वडील काँग्रेस सरकारमध्ये राज्यमंत्री, २५० गाड्यांचा ताफा घेऊन लेकाचा ‘मातोश्री’वर पक्षप्रवेश

मुंबई : पेणचे माजी नगराध्यक्ष आणि पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी शिशिर धारकर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश करणार आहेत. २५० गाड्यांचा ताफा घेऊन धारकर ‘मातोश्री’वर दाखल झाले आहेत. पेण, सुधागड, रोहा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी-कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

शिशिर धारकर हे पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणात आरोपी होते. त्यांना ठाकरे गटात पक्ष प्रवेश दिला जात असल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. धारकर हे गेली अनेक वर्ष राजकारणापासून लांब होते. मात्र आता ते पदाधिकारी कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात पक्ष प्रवेश करत आहेत.

कोण आहेत शिशिर धारकर?

शिशिर धारकर पेणचे माजी नगराध्यक्ष आहेत. धारकर हे पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी होते. ५०० कोटी पेक्षा अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पेण शहरात त्यांच्या विरोधात नागरिकांमध्ये असंतोष असल्याचं बोललं जातं. शिशिर धारकर यांनीच पैसे बुडवल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

ऐश्वर्या रायसारखे मासे खा, म्हणजे चिकने दिसाल, कोणीही पटवून घेईल, मंत्री विजयकुमार गावित यांचा सल्ला
गेल्या काही वर्षात धारकर राजकारणात सक्रिय नसल्याचे देखील बोलले जात आहे. याआधीही शिशिर यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश करण्यासाठी दोन-तीन भेटी घेतल्याची चर्चा आहे मात्र प्रवेश होऊ शकला नव्हता. अशातच उद्धव ठाकरे यांनी शिशिर धारकर पिता पुत्रांना पक्ष प्रवेश दिल्यामुळे त्यांना किती बळ मिळते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हायकमांडकडून विरोधीपक्षनेतेपद कसं मिळवलं? प्रतिभा धानोरकरांची कोपरखळी, वडेट्टीवार म्हणाले…
काही वर्षांपूर्वी पेण मतदारसंघावर शिशिर धारकर यांचे वर्चस्व होते मात्र सध्या भाजपचे रविंद्र पाटील स्थानिक आमदार असून पेण नगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. पेण अर्बन बँक घोटाळ्यानंतर आमदार रविंद्र पाटील यांनी आपले वर्चस्व अद्यापही कायम ठेवले आहे.

शिंदेंची शिवसेना नाही, तो गद्दारांचा गट आहे ; आदित्य ठाकरेंचा घणाघात

शिशिर धारकर यांचे वडील आप्पासाहेब धारकर हे काँग्रेसच्या काळात राज्यमंत्री होते. आप्पासाहेब धारकर १९८० ते १९८६ व १९९० ते १९९६ ह्या कालावधीत ते विधान परिषद सदस्य होते. ६ मार्च १९९३ रोजी आप्पासाहेबधारकर महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते. याच काळात ते रायगडचे पालक मंत्री सुद्धा होते.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here