Mumbai News: रस्त्यावरुन जात होता, ३२ व्या मजल्यावरुन लोखंडी रॉड कोसळला, तरुणासोबत भयंकर घडलं

Mumbai News: रस्त्यावरुन जात होता, ३२ व्या मजल्यावरुन लोखंडी रॉड कोसळला, तरुणासोबत भयंकर घडलं

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: वरळी येथे एका ३२ मजली इमारतीच्या गच्चीवरून लोखंडी रॉड पडून अनुभव तिवारी (३६) हा पादचारी गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेत तिवारी यांच्या हाताची दोन बोटे तुटली असून त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. वाहनांचेही या दुर्घटनेत मोठे नुकसान झाले आहे. तिवारी यांना तत्काळ नजीकच्या जसलोक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

वरळी येथील ॲनी बेझंट रोडवर सिटी बेकरीजवळच्या आविष्कार हाइट्स या तळमजला अधिक ३२ मजली इमारतीच्या गच्चीवरून एक लोखंडी रॉड शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास इमारतीखालील चारचाकी वाहनांवर कोसळला. यावेळी रस्त्यावरून जाणारे पादचारी अनुभव तिवारी यांच्या हाताला या लोखंडी रॉडचा मोठा फटका बसला. या दुर्घटनेत त्यांची दोन बोटे तुटली असून इतर बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. तिवारी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे. इमारतीचे बांधकाम सुरू होते का, याबाबत अधिक तपशील कळू शकलेला नाही.

ज्याला दगड समजलं तो तर खजिना निघाला, एका रात्रीत शेतकऱ्याचं नशीब पालटलं
यंदाच्या फेब्रुवारीत वरळीतील फोर सीजन या तारांकित हॉटेल शेजारी बांधकाम सुरू असलेल्या ३२ व्या मजल्यावरून रात्री ९च्या सुमारास सिमेंटचे ब्लॉक कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून अनेक वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मार्चमध्ये जोगेश्वरी येथे एआयएम पॅरेडाइज या १४ मजली इमारतीतही असाच प्रकार घडला होता.

खड्ड्यांमुळे अपघातात जखमी झाला, खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेत मारतोय हेलपाटे

काम सुरू असताना इमारतीच्या स्लॅबसाठी खालून लोखंडी रॉडचा टेकू देण्यात आला होता. एक लोखंडी रॉड सातव्या मजल्यावरील स्लॅबखालून निसटून सुरक्षेसाठी लावलेली जाळी तोडून रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर कोसळला होता. या रिक्षामध्ये बसलेल्या शमाबानू आसिफ शेख (३८) आणि त्यांची मुलगी आयात आसिफ शेख (९) यांच्या अंगावर हा लोखंडी रॉड पडल्याने त्या दोघीजणी गंभीर जखमी झाल्या होत्या.

सना खानच्या माध्यमातून सेक्स्टॉर्शन रॅकेट? नवराच सूत्रधार असल्याची धक्कादायक माहिती

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here