गोंदिया – बल्लारपूर पॅसेंजर ट्रेन ही रात्री साडेदहा वाजता मूल स्थानकात पोहोतचे. मात्र, ही ट्रेन रविवारी मूल येथे पोहोचायला रात्रीचा दीड वाजला होता. अगोदरच गाडी उशीरा आल्याने रेल्वेची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांचे तीन ते चार तास हाल झाले. मात्र, खरे नाट्य यानंतर सुरु झाले. या एक्स्प्रेस गाडीच्या मोटारमनने चंद्रपूर स्थानकात पोहोचताच माझी ड्युटी संपली आहे, मी आता गाडी चालवणार नाही, असा हेका धरला.
यामुळे प्रवासी चांगलेच संतापले. हा प्रकार मूल रेल्वे स्टेशनवर काल मध्यरात्री घडला. अखेर रेल्वे प्रशासनाने लेखी दिल्यानंतर पॅसेंजर ट्रेन पुढे सरकली. मात्र यादरम्यान प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. अनेक दिवसांपासून या मार्गावरील पॅसेंजर गाड्या नियमीत उशीरा चालत असल्याने रेल्वे प्रवाशी नाराजी व्यक्त करत आहेत.
स्टेशन मास्तरचे वागणं बरं नाही…
रात्री बारा वाजता पॅसेंजर मुल स्टेशनवर थांबली. जवळपास एक ते दीड तास तिथेच अडली. यावर प्रवाशांनी गाडीला उशीर का झाला, अशी विचारणा स्टेशन मास्तरांनाकेली. त्यावर स्टेशन मास्तरांनी प्रवाशांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. महिला प्रवाशीही स्टेशन मास्तरच्या कचाट्यातून सुटल्या नाहीत. गोंदियातून निघणारी ही पॅसेंजर ट्रेन दहाच्या आसपास मुल किंवा चंद्रपूर स्थानकात दाखल होणे अपेक्षित आहे. त्यानंतर ही गाडी पुढे बल्लारपूरच्या दिशेने रवाना होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही पॅसेंजर ट्रेन वेळेवर येतच नाही. त्यामुळे प्रवाशांना स्थानकात उतरल्यानंतर घरी पोहोचण्याचा प्रवास रात्री-अपरात्री करावा लागतो. या सगळ्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गाडीत हृदयविकाराचे प्रवासी, कुटुंबाचे धाकधुक वाढली
या रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांमध्ये हृदयविकाराच्या एक रुग्ण होता. त्याला तात्काळ चंद्रपूरला नेणं गरजेचं होतं. मात्र रेल्वे सुटायला फार उशीर होत असल्याने त्या रुग्णाच्या कुटुंबाची धाकधूक वाढली होती. त्यामुळं त्यांनी रेल्वे प्रशासनाला गाडी लवकर सोडायची विनंती केली होती. मात्र तेथील स्टेशन मास्तर प्रवाशांशी हुज्जत घालत राहिले.