पिंपरी: पिंपरी चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फोनवर बोलताना एका इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना डांगे चौक येथे बुधवारी (दि. ६) सकाळच्या सुमारास घडली होती. अजय रंगनाथ हंडीबाग (२१, रा. शिवशंकर हौंसिंग सोसायटी, म्हेत्रेवस्ती, चिखली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अचानक घडलेल्या घटनेने सर्वांना धक्का बसला आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हे बुधवारी सकाळीच्या सुमारास डांगे चौक येथील हाय लाइफ टॉवर येथील इमारतीमध्ये कामानिमित्त गेले होते. मात्र त्यांना फोन आल्याने ते मोबाईलवर बोलत असताना ते इमारतीवरून खाली पडले. त्यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पंचनामा करत त्यांचा मोबाईल तपासला. मात्र त्या मोबाइलचा डिस्प्ले फुटल्याने ते नेमके कोणाशी बोलत होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पोलिसांकडून त्यांच्या मोबाइल क्रमांकाचा सीडीआर मागविण्यात आला आहे. त्यानंतर यामगचे कारण समोर येणार आहे. मात्र ते ज्या इमारतीवरून खाली पडले त्या ठिकाणावर कठडे लावलेले आहेत. त्यामुळे नेमके ते खाली पडले की पाडले की ती आत्महत्या आहे याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. अजय यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. ते नेमके कुठल्या कामासाठी आले होते, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. याबाबत वाकड पोलीस तपास करीत आहेत.