संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला न्याय द्या,पाठिंबा देऊ, ठाकरेंचं मोदींना आवाहन

संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला न्याय द्या,पाठिंबा देऊ, ठाकरेंचं मोदींना आवाहन

जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं होतं. या गावात मराठा आंदोलकांवर काल लाठीमार करण्यात आला. या गावातील आंदोलकांची भेट घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि आमदार राजेश टोपे घेण्यासाठी दाखल झाले.

महाविकास आघाडीचं सरकार असताना मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं होतं पण त्यावेळी लाठ्या उगारण्यात आल्या नव्हत्या. मराठा संघटनांनी ज्यावेळी मागणी केली त्यावेळी चर्चा केली होती. हे सरकार नेभळट सरकार आहे. मराठा समाजाच्या बांधवांचा गुन्हा काय आहे? गोळ्या मराठा समाजाच्या बांधवांवर चालवल्या गेल्या आहेत. खास अधिवेशन बोलावलेलं आहे तर दिल्लीचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फिरवले त्याच पद्धतीनं मराठा समाज, धनगर समाज आणि ओबीसींच्या प्रश्नावर मार्ग काढा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दिल्लीवरील केंद्राचे अधिकार कोर्टानं नाकारले होते. कोर्टानं दिलेला निर्णय सरकारनं बहूमताच्या जोरावर बदलला होता, असं त्यांनी सांगितलं.

अशोक चव्हाण आणि मी आज कोणीही नाही पण तुमच्यासाठी आम्ही इथं आलो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मराठा समाज शांतताप्रिय आहे. जालन्यातील आंदोलकांच्या केसाला धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र आणून इथं उभा करेन, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

सरकारने चुकीच्या लोकांशी टक्कर घेतली आहे. मराठवाडा ही संतांची भूमी आहे तशी वीरांचीही आहे. पोलिसांना आलेला वरचा फोन कुणाचा ते कळले पाहिजे. या प्रकरणात गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे ठाकरे म्हणाले. सरकार लोकशाहीचा खून करीत असल्याची टीकाही त्यांनी केली. तुम्ही चुकीच्या लोकांशी पंगा घेतलेला आहे. रझाकारांशी लढणाऱ्यांचे हे सर्व आंदोलक वारसदार आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

मुख्यमंत्र्यांना आंदोलनाबाबत माहिती कळवली जाते. शांततेनं जे आंदोलन चालू असताना वरुन कुणाचा फोन आला होता असं सांगितलं गेलं तर वरचा फोन कुणाचा होता हे पण आम्हाला कळलं पाहिजे. नागपूरमधील गोवारी लाठीमार प्रकरणात मधुकर पिचड यांचा राजीनामा घेतला गेला होता. त्यानंतर लोकांनी काँग्रेसचं सरकार पाडलं होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

गेल्या काही दिवसांपूर्वी कोकणात बारसूमध्ये महिला आणि पुरुषांवर हल्ला केला. वारकऱ्यांवर हल्ला केला गेला , असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. मराठा समाजाच्या बांधवांवर जे गुन्हे टाकले गेले आहेत ते मागं घ्यावेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

केंद्रानं विशेष अधिवेशनात मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्या, आम्ही पाठिंबा देऊ, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मनोज जरांगे यांच्या तब्येतीची काळजी घ्या, असंही ठाकरे आवाहन केलं.

NCP : जुन्नरसाठी दोन्ही पवारांनी लावली फिल्डिंग, एकाच आमदारासाठी दोघांचा दौरा, अतुल बेनकेंच्या निर्णयानं..

अशोक चव्हाण काय म्हणाले?

इंडियाची बैठक सुरु असताना बातमी कानावर आली आणि उद्धव ठाकरे म्हणाले आपल्याला मनोज जरांगे पाटील यांना भेटायला जायचं आहे असं म्हणाल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. अंतरावली सराटी हे गाव संवेदनशील आहे. आरक्षणासाठी तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. सुप्रीम कोर्टानं नाकारल्यानंतर आम्ही पिच्छा सोडला नाही. शासनाच्या प्रमुख लोकांनी चर्चा केली असती, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, दोन शब्द प्रेमाचे बोलले असते तरी चाललं असतं पण तसंही केलं नाही, असं अशोक चव्हाण म्हणाले. महाराष्ट्रात सामील होताना कधीही उद्रेक केला नव्हता. पण आमच्या नशिबी लाठ्या काठ्या खाण आहे का, असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला.
IND vs PAK LIVE Score : भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार की नाही, जाणून घ्या…
संसदेच्या विशेष अधिवेशनात मार्ग काढून कायदा बदला आणि मराठा आरक्षण मिळालंचं पाहिजे यासाठी बदल करा. कायद्यात बदल करा मविआ च्या खासदारांची तिचं भूमिका असेल, असं अशोक चव्हाण म्हणाले. आरक्षणावर सरकारनं भुमिका स्पष्ट करावी. केंद्र आणि राज्यानं मिळून भूमिका घ्या, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं.

जर पावसामुळे २० षटकांचा सामना झाला तर पाकिस्तानला किती धावांचे टार्गेट मिळणार, पाहा समीकरण

गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी, तुमचं वैफल्य जनतेवर काढू नका | संजय राऊत

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here