मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

शिर्डी, दि.३१ (उमाका वृत्तसेवा) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचेही दर्शन घेतले.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मंदिरात आगमन झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्वागत केले. यावेळी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवाशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेत पाद्यपूजा व आरती केली.  श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी पी. सिवाशंकर यांनी मुख्यमंत्री व केंद्रीय संरक्षण मंत्री यांचा श्री साईबाबा यांची मूर्ती भेट देऊन सन्मान केला.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here