दहीहंडीच्या कार्यक्रमात भिंत कोसळल्यानं ८ वर्षीय मुलगी दगावली आहे तर ९ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा शहरातील मानसिंग पुरा येथे ही घटना घडली आहे. दहीहंडीची एका बाजूची दोरी भिंतीमधील गॅलरीला बांधलेली होती. त्या दोरीला काही तरुण दहीहंडी फोडण्यासाठी लटकले तेव्हा भिंत कोसळली आणि या घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. निदा रशीद खान पठाण असे मृत मुलीचे नाव आहे तर अल्फिया शेख हफीज ही ९ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
कधी घडली घटना?
बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगावराजा येथे दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट लागलं आहे. दहीहंडीची दोरी ज्या गॅलरीला बांधलेली त्याची भिंत कोसळून १ मुलगी ठार, १ मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेत एक चिमुकली जागीच ठार झाली आहे. ही घटना रात्री आठच्या सुमारास शहरातील मानसिंगपुरा येथे घडली.
जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीसाठी बंद अवस्थेत असलेल्या एका घराच्या गॅलरीवर दोरी बांधण्यात आली होती. त्यावेळी सिमेंटच्या पिलर सह लोखंडी गॅलरी खाली कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत खाली उभं राहून दहीहंडी पाहणाऱ्या निदा रशीद खान पठाण वय ९ वर्ष हिचा जागीच मृत्यू झाला. झाली. तर अल्फिया शेख हाफिज ही ८ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनं भागात खळबळ उडाली होती.