उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्य अधिस्वीकृती पत्रकार समिती पदाधिकाऱ्यांचा सत्कार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्य अधिस्वीकृती पत्रकार समिती पदाधिकाऱ्यांचा सत्कार

मुंबई ,दि ३१ :  राज्य अधिस्वीकृती पत्रकार समितीचे अध्यक्ष यदु जोशी आणि समिती सदस्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच पुढील वाटचालीसाठी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी दैनिक पुढारीचे पत्रकार उदय तानपाठक, दिलीप सपाटे, नवशक्तीचे संपादक संजय मलमे, नवाकाळच्या नेहा पुरव,  आयबीएन लोकमत गडचिरोलीचे महेश तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. जोशी आणि सदस्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी पत्रकारांची निवृत्तीवेतनवाढ, निवासस्थानाचा प्रश्न, आरोग्यसुविधा, बैठकांसाठी मानधन, प्रवासभत्तावाढ आदी प्रश्न मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले. पत्रकारांच्या मागण्यांबाबत संबंधित विभागाकडून प्रस्ताव आल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार सकारात्मक विचार करेल, अर्थ विभागाचे त्याला सहकार्य असेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी श्री. जोशी आणि समिती सदस्यांना दिले.

०००

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here