अजित पवारांना योग्यवेळी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचंय; बड्या नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

अजित पवारांना योग्यवेळी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करायचंय; बड्या नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

सातारा : पुढच्या पिढीचा विचार करता महाराष्ट्रात ना. अजित पवार यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एकविसाव्या शतकात अजितदादा हेच महाराष्ट्राला प्रमुख व सक्षम राज्य म्हणून विकास करू शकतील. त्यासाठी अजित पवार यांना योग्य वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे आहे, असे प्रतिपादन आ. रामराजे नाईक – निंबाळकर यांनी केले.

दहिवडी (ता. माण) येथे आयोजित कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष सुभाष नरळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे, माजी सभापती संदीप मांडवे आदी उपस्थित होते.

आ. रामराजे म्हणाले, खा. शरद पवार यांनी देशात, राज्यात विकासाचे राजकारण केले व तेच कार्यकर्त्यांना शिकवले. भविष्यातील विकासासाठी आम्हाला युती सरकारमध्ये सहभागी होण्याचा क्लेशदायक निर्णय घ्यावा लागला. १९९९ साली शरद पवार यांना पंतप्रधान करावे या भूमिकेतून त्यांच्या सोबत गेलो. आजपर्यंत त्यांना साथ दिली.

अजित पवारांनी भाजप नेत्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या होत्या, फडणवीसांचा एक निर्णय-दादांना धक्का

भविष्यात पुढच्या पिढीचा विचार करता महाराष्ट्रात ना. अजित पवार यांच्याशिवाय दुसरा पर्याय असेल असे मला वाटत नाही. राज्याचा विकास सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही सरकारमध्ये सामील झालो आहे. तो आम्ही करत राहू. त्याच पद्धतीने अजितदादांना साथ देत राहणार आहे. योग्य वेळ आल्यावर त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करावयाचे आहे. त्यासाठी आम्ही आगामी काळात प्रयत्नशील राहणार आहोत. कार्यकर्त्यांनी खंबीर साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Video : मी तयारीतच आहे… दादांच्या धाकट्या लेकाचे मोठे संकेत, बारामतीच्या कार्यकर्त्यांना काय म्हणाले?

दरम्यान, कमी पर्जन्यमान असलेल्या माण- खटाव तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हे तालुके टंचाईग्रस्त घोषित करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी आ. रामराजे यांच्याकडे केली. तसेच आपण महाराष्ट्रातून दिल्लीच्या राजकारणात जावे, अशी भावनाही कार्यकर्त्यांनी केली.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here