मंत्रालयातील प्रदर्शनात महिला बचत गटांकडून ४ लाख रुपयांच्या वस्तूंची विक्री

मंत्रालयातील प्रदर्शनात महिला बचत गटांकडून ४ लाख रुपयांच्या वस्तूंची विक्री

मुंबई दि. १० : महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मंत्रालयात दिवाळीनिमित्त विविध उत्पादनांच्या प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन करण्यात आले. याद्वारे महिला बचत गटांनी सुमारे ४ लाख रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. महिला बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, अल्पसंख्याक विभागाच्या सचिव आय.ए.कुंदन, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इन्दु जाखड यांनी उत्कृष्ट कामगिरीसाठी महिलांना प्रशस्तिपत्रक प्रदान करून अभिनंदन केले. मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयेाजित पणती सजावट स्पर्धेस उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात दिवाळीनिमित्त महिला बचत गटांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येत आहे. ठाणे, मुंबई, पुणे, नंदुरबार, जालना, चंद्रपूर, स्वाभिमान प्रकल्प (मालाड) येथून आलेल्या महिला बचत गटांचा यात समावेश आहे. १० स्टॉल असून २० महिलांचा यामध्ये सहभाग आहे. यावेळी त्यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी पणती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना वस्तू खरेदीत २० टक्के सूट देण्यात आली असल्याची माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाने दिली आहे.

महिला बचत गटांनी केली ४ लाख रूपयांच्या वस्तूंची विक्री

मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित महिला बचत गटांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.महिला बचत गटांनी तयार केलेल्या दिवाळी फराळ, सेंद्रीय शेतमाल उत्पादनांचा स्टॉल, हस्तकला तोरण, लेदर वर्क, महिलांची सौंदर्य प्रसाधने या वस्तूंचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या स्टॉलमधून महिला बचत गटांनी केली ४ लाख रूपयांच्या वस्तूंची विक्री केली असल्याची माहिती महिला व आर्थिक विकास महामंडळाकडून देण्यात आली.

००००

संध्या गरवारे/विसंअ

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here