पतीने घरातून हाकललं, पत्नीने इमारतीच्या जिन्यातच आयुष्य संपवलं, पुण्यातील रविवार पेठेतील घटना

पतीने घरातून हाकललं, पत्नीने इमारतीच्या जिन्यातच आयुष्य संपवलं, पुण्यातील रविवार पेठेतील घटना

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पतीने घरातून हाकलून दिल्याने महिलेने सोसायटीच्या जिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पुण्यातील प्रसिद्ध रविवार पेठेत घडली. पतीने घरातून हाकलून दिल्यानंतर महिला तीन दिवस उपाशी होती.

सुलभा सुरेंद्र पुजारी (वय ४२, रा. वैष्णव अपार्टमेंट, रविवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती सुरेंद्र रवींद्र पुजारी (वय ४२), दीर समीर, सासू रजनी यांच्यविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुलभा यांचा भाऊ रवी वाघे (वय ४४, रा. गणेशनगर, उस्मानाबाद) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चुकून फास्ट ट्रेनमध्ये चढली, गडबडीत प्लॅटफॉर्मवर उडी, डोंबिवलीकर भाग्यश्रीचा दुःखद अंत
सुरेंद्र पुजारी आणि त्याचे कुटुंबीय सुलभा यांचा छळ करीत असल्याचा आरोप केला जात आहे. सुरेंद्रने सुलभाला घरातून हाकलून दिले. सुलभा तीन दिवस सोसायटीच्या जिन्यात राहत होत्या. त्यांना जेवणही देण्यात आले नव्हते.

पोलिसांनी घडवली अद्दल, जिथे वाहनांची तोडफोड तिथेच काढली धिंड

तीन दिवसांपूर्वी सुलभा यांनी जिन्याच्या शेजारी असलेल्या खिडकीला दोर बांधून गळफास घेतला. सुलभा यांचा भाऊ रवी यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर ते पुण्यात आले. चौकशीत सुलभा यांचा छळ करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर रवी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

Dahihandi 2023: उंच थरावरुन पडून संदेशचा मृत्यू, शिवशंभो गोविंदा पथकाचा मोठा निर्णय, यंदा दहीहंडीला…

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here