रामदास आठवलेंचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाले – आरपीआयशिवाय महायुतीला निवडून येणं अशक्य

रामदास आठवलेंचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाले – आरपीआयशिवाय महायुतीला निवडून येणं अशक्य

सातारा: साताऱ्यात आज रिपाईच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे साताऱ्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून लढवणार असल्याचे घोषित केले असून भाजपने सुद्धा माझा विचार करावा, असं म्हटलं आहे.
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात पुण्याचा डंका! मृणाल गांजाळे यांनी कोरले नाव, ठरल्या राज्यातील एकमेव शिक्षिका
तसेच मागच्यावेळी भाजपच्या चिन्हावर आमचे पाच उमेदवार उभे होते. त्यापैकी दोन उमेदवार निवडून आले. परंतु आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर उभे राहणे योग्य नाही. मी तीन वेळा जेव्हा काँग्रेसच्या आघाडीबरोबर निवडून आलो, तेव्हा रिपाईच्या चिन्हावर निवडून आलो. त्यामुळे यावेळी २ लोकसभा आणि ८-१० विधानसभेच्या जागा मिळाव्यात हा आमचा प्रयत्न आहे. या वेळी रिपाईचे ५ ते ६ आमदार निवडून येतील, तशी आमची बांधणी सुरू आहे, असे ते म्हणाले.

२०१९ चं मी काय सांगणार नाही, कारण मला पहाटे उठायची सवयच नाही; मंत्री धनंजय मुंडेंची फटकेबाजी

रामदास आठवले सर्व घटक पक्षांशी एकत्र बसून आम्ही चर्चा करू. महाराष्ट्रातील माझा गट प्रभावी आहे. त्यामुळे रिपाईच्या माझ्या गटाला डावलून चालणार नाही. महायुतीतील सर्व नेत्यांना आवाहन आहे, की रिपाईकडं दुर्लक्ष करु नये. रिपाईला सोबत घेतल्याशिवाय महायुतीला निवडून येणं अशक्य आहे, असे खळबळजनक वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here