‘दिवाळी अंक’ महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक पंरपरेचे प्रतिक – निवासी आयुक्त, रूपिंदर सिंग

 ‘दिवाळी अंक’ महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक पंरपरेचे प्रतिक – निवासी आयुक्त, रूपिंदर सिंग

नवी दिल्ली, १९: ‘दिवाळी अंक’ महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक पंरपरेचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रुपिंदर सिंग यांनी दिवाळी अंकांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी आज केले.

महाराष्ट्रात दिवाळी अंकांची दीर्घ परंपरा आहे. विविध विषयांना वाहिलेल्या आकर्षक दिवाळी अंकांचे महाराष्ट्र परिचय केंद्रातील प्रदर्शन म्हणजे दिल्लीतील मराठी माणसांसाठी साहित्यिक मेजवानी असल्याचे मत श्री. सिंग यांनी येथे मांडले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात, दिवाळी विशेषांक प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तसेच प्रधान सचिव श्री. रुपिंदर सिंग यांच्या हस्ते झाले. उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री. सिंग यांचे स्वागत केले. यावेळी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

दिवाळी हा भारतीयांचा प्रमुख सण म्हणून देशभर साजरा होता. महाराष्ट्रात दिवाळी निमित्त प्रकाशित होणाऱ्या दिवाळी विशेषाकांच्या पंरपरेमुळे वेगळी ओळख निर्माण झाली आहे. महाराष्ट्र आणि देशभर जिथे मराठी लोक राहतात तिथूनही विशेषांक प्रकाशित केले जातात.

महाराष्ट्रात १९०९ पासून सुरू झालेल्या दिवाळी विशेषकांची सुरु झाली.  दिवाळी विशेषांक हा अक्षर सोहळा म्हणून आता दरवर्षी साजरा होत आहे. वाचकांच्या अभिरूचींना जपत आज जवळपास सर्वच  विषयांवर दिवाळी अंक बाजारात  उपलब्ध आहेत. दिवाळी अंकांमुळे नवोदित लेखकांपासून तर प्रतिष्ठित लेखकांपर्यंतचे विविध विषयांवरील लेखन यामध्ये कथा, कविता, तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवरील लेख  एकाच अंकात वाचण्याची पर्वणी यानिमित्ताने मिळत असल्याचेही श्री. सिंग यावेळी म्हणाले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने विशेषांक प्रदर्शन येथील वाचकांसाठी पर्वणी असून दिल्ली परिसरातील वाचकांनी याचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. सिंग यांनी यावेळी केले.

प्रदर्शनात १२० दिवाळी अंकांची मेजवानी

 या प्रदर्शनात गृह लक्ष्मी, आवाज,  मिळून साऱ्याजणी, चारचौघी, श्री व सौ, अंतर्नाद, जत्रा, किशोर, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, लोकमत-दीपोत्सव, साप्ताहिक सकाळ,  झी मराठी, धनंजय, साधना,  सामना,  अक्षरधारा,  प्रपंच, छावा, मैत्र, निनाद, हंस, ऋतुरंग, स्वरप्रतिभा, आदी दिवाळी अंक मांडण्यात आले आहेत. हे प्रदर्शन आजपासून सुरू झाले असून, सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत शुक्रवार दि. २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

०००

 

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here