‘दिलखुलास’ कार्यक्रमात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांची १ व २ सप्टेंबर रोजी मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांची १ व २ सप्टेंबर रोजी मुलाखत

मुंबई, दि. 31: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर  चन्ने यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शुक्रवार दि.1, शनिवार दि. 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल.

अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या एसटीची सध्या स्थिती कशी आहे, एसटीची पुढील धोरणे काय आहेत, एसटीकडून दिल्या जाणाऱ्या सवलती, बस स्थानकांचे आधुनिकीकरण अशा विविध विषयांची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर  चन्ने यांनी दिलखुलास कार्यक्रमात दिली आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here