पतीचे करोनात निधन; पत्नी पडली एकटी, अल्पवयीन मुलाला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात, अन् नंतर केलं धक्कादायक कृत्य

पतीचे करोनात निधन; पत्नी पडली एकटी, अल्पवयीन मुलाला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात, अन् नंतर केलं धक्कादायक कृत्य

पुणे: पोलिसात देण्याची भीती दाखवून एका महिलेने अल्पवयीन मुलासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरात घडला आहे. याप्रकरणी १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने २८ वर्षीय महिलेच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा सर्व प्रकार मे २०२१ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत २ ते ३ वेळा घडला असल्याचं तक्रारीत म्हटले आहे.
धक्कादायक! कॉफी शॉपमध्ये सुरू होते गैरकृत्य; पोलिसांना मिळाली गुप्त माहिती, टाकली धाड अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलगा आणि महिला हे पुण्यातील कोंढवा परिसरात शेजारी-शेजारी राहतात. आरोपी महिलेच्या पतीचे कोरोना काळात निधन झाले. त्यानंतर या आरोपी महिलेने या अल्पवयीन मुलाला जाळ्यात ओढत जबरदस्तीने शरीर संबंध प्रस्तापित केले. फिर्यादी तरुण हा अल्पवयीन आहे. हे माहीत असतानाही आरोपी महिलेने त्याच्यासोबत जबरदस्ती केल्याची पोलिसात तक्रार देईल अशी धमकी दिली. त्याची इच्छा नसतानाही जबरदस्तीने त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवले. शरीर संबंध ठेवत असताना आरोपी महिलेने फिर्यादीला व्हिडिओ चित्रित करण्यास भाग पाडले.

महाराष्ट्रातलं असं प्रकरण ज्यात ५०० तरुणींचं आयुष्य उद्धवस्त झालं होतं

मे २०२१ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत आरोपी महिलेने दोन ते तीन वेळा जबरदस्तीने हा संपूर्ण प्रकार केला. आरोपी महिलेच्या मोबाईलमध्ये यासंबंधीची व्हिडिओ क्लिप असल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलाच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली. त्यांनी या संबंधित तक्रार दिली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here