रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी स्वीकारला पदभार – महासंवाद

रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी स्वीकारला पदभार – महासंवाद




मुंबई, दि.०३ : रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात ग्रामीण विकासाचा एक नवा आदर्श तयार करण्यासाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भारत गोगावले यांनी केले. रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री श्री. गोगावले यांनी मंत्रालयात विभागाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री श्री.गोगावले म्हणाले की, रोजगार हमी कामांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील गावांमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. तोच पॅटर्न राज्यात राबवून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात, विशेषतः ग्रामीण भागात ‘रोजगार हमी’ मुळे बदल होत आहेत. या बदलांची गती वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मंत्री श्री. गोगावले यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रोजगार हमी विभागातील व मंत्री कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

०००

 







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here