‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त’ अध्यक्ष न्या. सुरेंद्र तावडे व  कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांची मुलाखत

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त’ अध्यक्ष न्या. सुरेंद्र तावडे व  कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांची मुलाखत




मुंबई, दि. 20: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त’ राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष, न्या. सुरेंद्र तावडे तसेच मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व  केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून सोमवार दि. 23, मंगळवार दि. 24, बुधवार दि. 25 आणि गुरुवार दि.26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे.

दरवर्षी 24 डिसेंबर रोजी देशभरात ‘राष्ट्रीय ग्राहक दिवस’ साजरा केला जातो. ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर सातत्याने काळजी घेण्यात येत आहे. विकसित होणाऱ्या बाजारात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे जगातील सर्वच देशात नामांकित ब्रँडस् सहजपणे उपलब्ध होत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांची फसवणूक होऊ नये याकरिता ग्राहक संरक्षण कायदाही लागू करण्यात आला आहे. ग्राहक  संरक्षण कायदा, त्याअंतर्गत ग्राहकांना कोणते अधिकार व संरक्षण देण्यात येते, ग्राहकांची फसवणूक झाल्यास दाद कुठे व कशी मागायची अशा विविध विषयांची या दिनानिमित्त विस्तृत माहिती राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष, न्या. तावडे व मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष श्री. देशपांडे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे. जेष्ठ निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

ooo







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here