स्वीप अंतर्गत भोकर येथे तृतीयपंथी मतदारासाठी विशेष कार्यक्रम – महासंवाद

स्वीप अंतर्गत भोकर येथे तृतीयपंथी मतदारासाठी विशेष कार्यक्रम – महासंवाद




नांदेड दि. 5 नोव्हेंबर:- नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम घेतले जात आहेत. भोकरमध्ये स्वीप अंतर्गत  तृतीयपंथी मतदारांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. या उपक्रमात मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेतली आणि मतदानासाठी स्वाक्षरी मोहीम तसेच सेल्फी काढून या उपक्रमात सहभाग नोंदवला.

भोकरमध्ये मतदार जागृतीच्या दृष्टीने आयोजित केलेल्या या विशेष कार्यक्रमात तृतीयपंथी मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. त्यांनी स्वाक्षरी मोहीमेत सहभाग घेतला आणि मतदान करण्याचा संकल्प केला. या उपक्रमाद्वारे तृतीयपंथी मतदारांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दिली आणि सामाजिक योगदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

यावेळी गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे यांनी मतदानाच्या प्रक्रियेतील पारदर्शकता व जबाबदारी या विषयी माहिती दिली. यावेळी सुमन गोणारकर यांनी मतदारांना मतदान प्रक्रियेची माहिती दिली आणि त्यांच्याशी संवाद साधत त्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाने तृतीयपंथी मतदारामध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला. या कार्यक्रमामुळे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.  यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी जकियोद्यीन शेख, मिलिंद जाधव, सुधांशु कांबळे आदींची उपस्थिती होती.

०००००







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here