सातारा दि.28 (जिमाका):सातारा शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची व पोलीस बंदोबस्ताची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दुचाकीवरून पाहणी केली.
या पाहणी प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह पोलिस विभागातील अधिकारी उपस्थित होते.
विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण सातारा जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांना सर्वतोपरी सहकार्य करावे, असे पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले
पालकमंत्री श्री. देसाई यांनी मोती चौक ते नगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या गणेश विसर्जन कृत्रिम तळ्यापर्यंत पाहणीही केली. तसेच त्यांनी गणेश विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांशी, निर्माण करण्यात आलेल्या सुविधेविषयी चर्चाही केली.
००००