मतदारांसाठी मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध – अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अश्विनी जोशी – महासंवाद

मतदारांसाठी मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध – अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अश्विनी जोशी – महासंवाद

मुंबई, दि. २२ : मतदारांना मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, अपर जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी निवडणूक फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे तसेच मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

डॉ. जोशी म्हणाल्या की, प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे,  दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्प आदी सुविधा पुरविण्यात येणार असून प्रत्येक मतदान केंद्राचे सूक्ष्म नियोजन करुन अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात विविध पथके तैनात करण्यात आली असून यासाठी क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

निवडणूक प्रक्रिया निःपक्षपाती, शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज – जिल्हाधिकारी संजय यादव

सर्व निवडणूक प्रक्रिया निःपक्षपाती, भयमुक्त आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज असून सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले आहे. मतदान केंद्रांवर मतदाराना अडचणी येणार नाहीत याची दक्षता घेवून प्रत्येक मतदान केंद्रावर प्रतीक्षा कक्ष, टोकन सिस्टीम याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे श्री. यादव यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले की, मतदारांना मतदान केंद्राची माहिती व्हावी, यासाठी बीएलओमार्फत घरोघरी मतदार चिट्टीचे वाटप करण्याची मोहीम सुरू आहे. मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून शालेय विद्यार्थ्यांकडून पालकांना मतदानासाठी संकल्पपत्र हा अभिनव उपक्रम मुंबई शहर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

भारत निवडणूक आयोगाने  विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई शहर जिल्ह्यात 10 विधानसभा मतदार संघांसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडावी, यासाठी आचारसंहितेच्या काटेकोर व प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात येत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेला विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे

  • निवडणूकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याबाबचा दिनांक – 22 ऑक्टोबर 2024
  • नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटचा दिनांक – 29 ऑक्टोबर 2024 (मंगळवार)
  • नामनिर्देशन पत्र छाननी दिनांक – 30 ऑक्टोबर 2024 (बुधवार)
  • नामनिर्देशन पत्र परत घेण्याचा शेवटचा दिनांक – 4 नोव्हेंबर 2024 (सोमवार)
  • मतदान – 20 नोव्हेंबर 2024 (बुधवार)
  • मतमोजणी – 23 नोव्हेंबर 2024 (शनिवार)

मुंबई शहर जिल्ह्याबाबत माहिती

एकूण मतदान केंद्र – 2 हजार 537

  • उत्तुंग इमारतीमधील (High rise Building) मतदान केंद्र – 156
  • सहकारी गृहनिर्माण सोसायटी मधील मतदान केंद्र 100,
  • झोपडपट्टी परिसरात मतदान केंद्र 313
  • मुंबई शहर जिल्ह्यात मंडपातील मतदान केंद्र 75

विधानसभा मतदार संघ निहाय मतदार संख्या

धारावी-  2 लाख 61 हजार 012

सायन-कोळीवाडा- 2 लाख 81 हजार 462

वडाळा –  2 लाख 05 हजार 12

माहिम- 2 लाख 25 हजार 415

वरळी –  2 लाख 63 हजार 697

शिवडी-  2 लाख 74 हजार 472

भायखळा- 2 लाख 58 हजार 12

मलबार हिल – 2 लाख 60 हजार 672

मुंबादेवी –   2 लाख 41 हजार 454

कुलाबा – 2 लाख 64 हजार 931

अशी एकूण 25 लाख 36 हजार 139 मतदार संख्या आहे

  • महिला – 11 लाख 72 हजार 944
  • पुरुष- 13 लाख 62 हजार 951
  • तृतीयपंथी 244
  • ज्येष्ठ नागरिक (85+) 54 हजार 033
  • नवमतदार संख्या (18-19 वर्ष) 38 हजार 325
  • दिव्यांग मतदार – 6 हजार 344
  • सर्व्हीस वोटर – 392
  • अनिवासी भारतीय मतदार – 406

मतदारांच्या माहितीसाठी

https://voters.eci.gov.in/  या संकेतस्थळावरुन मतदार यादीतील नावासंदर्भात माहिती उपलब्ध आहे या संकेत स्थळाला भेट द्यावी, तसेच अधिक माहितीसाठी  हेल्पलाईन क्र. 1950 (टोल फ्री) वर संपर्क साधावा.

Voter helpline App – मतदारांना आपले नाव मतदार यादीत तपासता येईल व नवीन मतदार नोंदणी या ॲपद्वारे करता येईल. KYC App-  उमेदवारांबाबत माहिती या app वर उपलब्ध होऊ शकेल. C vigil ॲपच्या मदतीने आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार करता येते त्यानंतर त्यावर केलेल्या कारवाईची माहिती  100 मिनिटांत तुमच्यापर्यंत पोहोचते. जिल्हाधिकारी मुंबई शहर यांचे कार्यालय- नियंत्रण कक्ष क्र.-  022-2082 2781, निवडणूक नियंत्रण कक्ष – 7977363304

सुविधा पोर्टल

उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने नामनिर्देशन पत्र व शपथपत्र भरण्याकरता व निवडणूकीच्या अनुषंगाने विविध परवानग्या मिळणेसाठी अर्ज करण्याकरिता सुविधा या पोर्टलवर सर्व माहिती उपलब्ध आहे.

C-Vigil app

दि.15 ते 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत  सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण 14 तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. तर NGSP पोर्टलवर 101 तक्रारी प्राप्त झाल्या असून 67 तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून उर्वरित तक्रारींवर कार्यवाही सुरु आहे.

मतदान केंद्रांवर सुविधा

प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, कचरापेटी, स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर तसेच रॅम्पची व्यवस्था, रांगांमध्ये गर्दी झाल्यास मतदारांना बसण्यासाठी खुर्ची किंवा बाकडे, मोकळ्या ठिकाणी मतदान केंद्र असल्यास मंडपाची उभारणी,पंखे आदी निश्चित किमान सुविधा यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. मतदान केंद्रावर ठळक अक्षरात येथील सुविधांचा फलक मतदार केंद्र क्रमांक, दिशादर्शक  फलक लावण्यात येणार आहेत.

मनुष्यबळ

मुंबई शहर जिल्ह्यात 10 विधानसभा मतदार संघ असून एकूण 2537 मतदान केंद्र आहेत. ह्या मतदार केंद्राला प्रत्येकी एक असे 2537 बीएलओ आहेत. एकूण 364 क्षेत्रीय अधिकारी (Z.O) आहेत. जवळपास 12 हजार 500 पेक्षा अधिक मनुष्यबळ निवडणूक कामकाजासाठी उपलब्ध आहे.

मतदारांना आवाहन

प्रत्येक मतदाराला सुलभपणे मतदान करता यावे यासाठी मतदार चिठ्ठ्यांचे वितरण करण्यात येत आहे. नागरिकांना मतदान केंद्राविषयी माहिती उपलब्ध करुन द्यावी. ज्या मतदारांचा संपर्क होत नाही त्यांना दूरध्वनी, एसएमएस, व्हाट्सअप अशा माध्यमातून संपर्क करण्यात येवून मतदार केंद्राची माहिती देण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारची मतदारांची गैरसोय होऊ नये, यासाठी दक्षता घेण्यात येत आहे.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here