भूषण हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातील इमारत क्रमांक सातमध्ये तिसऱ्या माळ्यावरील डी ३१ क्रमांकाच्या खोलीत राहात होता. भूषण हा मागील काही दिवसांपासून नैराश्यात होता.
रविवारी सकाळी कामावर गेल्यानंतर सायंकाळी खोलीवर परतला. रात्री सहकाऱ्याने खोलीत जाऊन पाहिले असता भूषणने पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. भूषणच्या आत्महत्येमागील कारण कळू शकले नाही. या घटनेसंदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
भूषण रविवारी सकाळी आपली ड्युटी करून सायंकाळी रूमवर आला होता. रुममध्ये राहणारा त्याचा सहकारी हा रात्रीची ड्युटी असल्याने निघून गेला. दुसऱ्या दिवशी वेळ उलटून गेल्यावरही भूषण ड्युटीवर न आल्याने त्याच्या मित्राने दुसऱ्या मित्राला फोन करुन भूषणला ड्युटीवर यायला सांगण्यास असे सांगितले. त्याचा फोन बंद येत असल्याने त्याच्या मित्र मंडळींनी खोली गाठली.
दार जोरजोराने वाजवूनही उघडले नसल्याने सर्वांना संशय आला. सहकाऱ्यांनी दाराला जोराने धक्का देत उघडले, तेव्हा भूषण सीलिंग फॅनला दोराने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची माहिती आहे