पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवाव्यात – पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवाव्यात – पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि.3 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या विविध  योजना प्रभावीपणे राबवाव्यात, तसेच या योजनांचा लाभ जनतेला मिळण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे निर्देश महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या विविध  योजनांचा आढावा मंत्री श्री.विखे पाटील यांनी घेतला.त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी व शेळी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शितलकुमार मुकणे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी  श्री विखे पाटील म्हणाले, महामंडळाच्या प्रक्षेत्राचे बळकटीकरण आणि आधुनिकीकरणासाठी निधी देण्यात आला आहे. महामंडळाचे भाग भांडवल वाढविण्याबाबत ही निर्णय घेण्यात येईल. राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेचा आढावा घेण्यात आला. महामंडळाच्या माध्यमातून शेळी समुह योजना प्रभावीपणे राबवाव्यात, तसेच या योजनांचा लाभ जनतेला मिळण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे निर्देश ही यावेळी दिले.

0000000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here