स्वराज्य फौंडेशनचे दुर्गेश चव्हाण हे त्यांच्या एनजीओच्या माध्यमातून बेवारस व्यक्तींना आधार देण्याचे काम दुर्गेश चव्हाण हे करीत असतात त्याच माध्यमातून त्यांनी काल सायंकाळी सुरत बायपास हायवे येथून त्यांनी गौतमी पाटील यांच्या वडिलांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
त्यानंतर त्याच्या खिशातील आधारकार्डच्या आधारे त्या व्यक्तीचे नाव रविंद्र बाबुराव पाटील रा. वेळोदे ता. चोपडा असल्याचे कळले. व्यक्तीशी संबंधीतांनी संपर्क साधावा यासाठी चव्हाण यांनी सोशल मिडियावर मॅसेज व्हायरल केले. त्यानंतर रविंद्र यांच्याबद्दलची धक्कादायक आणि खळबळजनक माहिती कळू लागली.
रविंद्र पाटील यांच्या भावजाई शोभा आनंद नेरपगार ( पाटील ) या त्यांच्या मुलीसह हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पोहचल्या. रविंद्र पाटील हे प्रसिध्द नृत्यांगना, लावणी नृत्य करणाऱ्या गौतमी पाटील हिचे वडील असल्याच्या वृत्ताला शोभाबाई यांनी दुजोरा दिला आहे. रविंद्र पाटील यांची पत्नी आणि मुलगी गौतमी ह्या दोघी गेल्या पंधरा वर्षांपासून पुण्यात राहत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. मला त्याबद्दल जास्त माहित नसल्याचे देखील शोभाबाई म्हणाल्या. बेवारस म्हणून दाखल केलेले रविंद्र पाटील यांची मुलगी गौतमी पाटील असल्याची माहिती खुद्द दुर्गेश चव्हाण यांनाही नव्हती. मात्र सोशल मिडियावर मॅसेज व्हायरल केल्यानंतर त्यांना शंभराहुन अधिक फोन रविंद्र पाटील यांच्या प्रकृतीची विचारपुस करणारे आले. असल्याची माहिती दुर्गेश चव्हाण यांनी यावेळी दिली.