दारं उघडी ठेऊनच महिला बाहेर पडली; तरुणानं साधली संधी, घरात शिरला अन्…

दारं उघडी ठेऊनच महिला बाहेर पडली; तरुणानं साधली संधी, घरात शिरला अन्…

नागपूर: उपराजधानीत चोरांचा धुमाकूळ सुरूच असून रोज नवीन नवीन चोरीच्या घटना समोर येत आहे. दरम्यान अशीच एक घटना समोर आली आहे. जिथे घरातील दार उघडी असल्याचे दिसताच चोराने डाव साधत घरातील रोख रकमेसहित दागिने लंपास केले. न्यु कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील येरखेडा येथील साईप्रसाद सोसायटी येथील मेघा राहुल रंगारी (३८) यांच्या घरात घुसून चोरट्याने १० हजारांच्या रोख रकमेसह सव्वा लाखाचे दागिने लंपास केले आहेत.
श्रावण महिन्यात तरुणाने देवालाच केले टार्गेट; मंदिरात जायचा, पाया पडायचा, अन् अलगद…
मिळालेल्या माहितीनुसार, मेघा राहुल रंगारी या सोमवारी दुपारी १२.३० वाजता घरातील दार उघडे ठेऊन काही कामानिमित्त बाहेर गेल्या. त्या घराजवळ राहणाऱ्या नातेवाईक यांच्या घरी गेल्या होत्या. जाताना त्या घराला कुलुप न लावताच गेल्या. दरवाजा उघडा असल्याचे पाहता संधी साधून चोरटा घरात घुसला. तसेच घरातील रोख आणि दागिन्यांवर डल्ला मारून पसार झाला.

दुपारी १.३० वाजताच्या सुमारास मेघा या घरी परतल्या असता घरातील दार उघडं दिसलं. ते घरात शिरल्या. त्यांच्या घरातील वस्तू अस्तव्यस्त अवस्थेत होत्या. लोखंडी कपाटही उघडे होते. त्या कपाटातील दागिने आणि रोख रक्कम चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनतर त्यांनी लगेच याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास करत आहे.

फिंगर प्रिंट स्टार्ट अन् वॉइस कंट्रोल इलेक्ट्रीक बाईक; रिक्षाचालकाच्या मुलाचा भन्नाट प्रयोग

दरम्यान नागपुरात अशीच एक दुसरी घटना घडली आहे. ज्यात सासू सुनेला बेशुद्ध करुन चोरी करणाऱ्या टोळीला यशोधरानगर पोलिसांनी अटक केली आहे. सागर दामोदर यडणेकर (२३), जितेंद्र आसाराम यडणेकर (२०) आणि राजू पिसाराम गुजर (२६, सर्व कळमेश्वर) यांना अटक करण्यात आली आहे. वर्षा किरण बोरकर (२५) आणि तिची सासू पुष्पा (वय ४२, रा. धम्मदीपनगर) शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास घरी होत्या. तीन तरुण त्याच्या घरी आले.
एक्स्प्रेस गाड्यांमध्ये करायचे चोरी; पोलिसांनी रचला सापळा, पनवेलमध्ये गस्त अन् थेट रत्नागिरीत आवळल्या मुसक्या
एक गुंड त्याला म्हणाला, ‘आम्ही जामसवलीहून पालखी घ्यायला आलो आहोत, दान द्या.’ पुष्पा त्याला दहा रुपये देण्यासाठी गेली असता त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. पुष्पाने त्याला पाणी प्यायला दिले. तो पुष्पाला म्हणाला, तुझ्या मागे संकट आहे. धोका टाळण्यासाठी त्याने पुष्पाच्या हातावर लाल धागा बांधला. यानंतर पुष्पा आणि वर्षा बेशुद्ध झाल्या.यानंतर गुंडांनी पुष्पा यांच्या गळ्यातील आठ हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावून तिघेही पळून गेले. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्या चोरांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. त्यांच्याकडून दागिने जप्त करण्यात आले. तिघांनाही मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here