भाजपचे नेते संजय काकडे यांनी आज या चर्चानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहून पुण्यातून निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात बोलताना संजय काकडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातून निवडणूक लढवली तर इतिहासात नसेल झाला इतका मोठा प्रचंड विजय आम्ही पुण्यातून मिळवू, विरोधकांचे डिपॉजिट आम्ही जप्त करू. असं काकडे म्हणाले आहेत.
तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातून निवडणूक लढवली तर राज्यातील ४८ पैकी ४८ खासदार आमचे निवडून येतील. राज्याचे आणि पुण्याचे भाग्य उजळेल. असं काकडे म्हणाले आहेत. आम्ही रक्ताचं पाणी करून मोदींना निवडून आणू असा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, आज संजय ककडे यांनी पंतप्रधांना पत्र लिहून पुण्यातून निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. ज्याप्रमाणे उत्तरप्रदेश मध्ये निवडणूक लढवल्यानंतर त्याठिकाणी ९० टक्के जागांवर भाजपचा विजय झाला होता त्याचप्रमाणे पुण्यात निवडणूक लढवली तर १०० टक्के जागांवर भाजपचा विजय होईल, असं काकडेंनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मोदींच नाव चर्चेत आल्यानंतर आपले दंड थोपटले असून त्यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. यावर काकडे यांनी ‘धंगेकरांनी उभा राहावं त्यांना आमचा विरोध असण्याचे कारण नाही, त्यांना माझ्या शुभेच्छा’ असल्याचं म्हटले आहे. त्यामुळे एकीकडे बातमीत तथ्य नसल्याचं सांगताना भाजपने मात्र मोदींच्या संभाव्य उमेदवारीबद्दल तयारी सुरु केली आहे हे मात्र नक्की.