महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबईदि. ३० : महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. पालकमंत्री श्री. लोढा यांनी आज लोअर परळ येथे रक्षाबंधनानिमित्त मालवणी येथील महिलांना निमंत्रित केले होते. या प्रसंगी मालवणीतील महिलांनी त्यांना राख्या बांधल्या आणि औक्षण केले.

मुंबई उपनगरात मालाड येथील मालवणी परिसरात पालकमंत्री श्री. लोढा गेली ३ वर्षे रक्षाबंधनाचा सण साजरा करतात, तसेच स्थानिक महिलांच्या समस्या जाणून घेतात. त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करतात. भगिनींच्या संरक्षणासाठी मी सदैव त्यांच्या पाठिशी उभा राहीन व त्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करेन, असेही त्यांनी सांगितले.

***

संध्या गरवारे/विसंअ/

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here