विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

मुंबईदि. ३० : दहावी, बारावीत ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करुन उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक मंडळातील पहिल्या पाच माजी सैनिक/पत्नी यांच्या पाल्यांना १० हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी माजी सैनिकांच्या कुटुंबीयांनी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास माहिती द्यावी.

आयआयटीआयआयएमएम्स अशा नामवंत संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिकाच्या पाल्यांना २५ हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल. तसेच विविध खेळसाहित्यसंगीतगायनवादननृत्ययशस्वी उद्योजकाचा पुरस्कार मिळविणारेसंगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी मिळविणारेनैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी पार पाडणारेतसेच देश आणि राज्याची प्रतिष्ठा वाढेल, अशा स्वरुपाची लक्षणीय कामगिरी करणारे माजी सैनिकत्यांच्या पत्नी आणि पाल्यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. याबबात अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयमुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी कळविले आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here