पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री सिद्धेश्वर व रूपा भवानी मातेचे दर्शन घेतले

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री सिद्धेश्वर व रूपा भवानी मातेचे दर्शन घेतले

सोलापूर, दिनांक 16(जिमाका ):- सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कामकाजाला सुरुवात करण्यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री सिद्धेश्वर व रूपा भवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी सोलापूर सह राज्यातील सर्व जनतेला सुखी ठेवण्याचे साकडं  त्यांनी श्री सिद्धेश्वर व रूपा भवानी मातेला घातले.

दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी उच्च तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे सोलापूर शहरात आगमन झाले. यावेळी छत्रपती संभाजी महाराज पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शहीद हुतात्मा चार पुतळा, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले व महात्मा बसवेश्वर पुतळा यांना श्री. पाटील यांनी पुष्पहार घालून वंदन केले.

आज (16 ऑक्टोबर) रोजी सकाळी श्री सिद्धेश्वर तसेच रूपा भवानी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली. श्री श्री बसावारूढ महास्वामीजी मठ येथे सदिच्छा भेट देऊन मठाची पाहणी केली. यावेळी नरेंद्र काळे, मोहन डांगरे, विक्रम देशमुख उपस्थित होते.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here