मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभाचे वितरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना लाभाचे वितरण

परभणी, दि. 27 (जिमाका) : ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज येथे अनेक लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वितरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.

‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज कल्याण कार्यालय, परभणी यांच्यामार्फत परभणी येथील अमिता रौफ बक्श यांना तृतीयपंथी म्हणून ओळखपत्र देण्यात आले. तसेच के. के. एम. महाविद्यालय मानवत येथील इयत्ता बारावीची विद्यार्थिनी प्रियंका भगीरथ अदमाने हिला राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार अंतर्गत 10 हजार रुपयाचा धनादेश, पी. डी. जैन होमिओपॅथीक महाविद्यालयाच्या तनुजा संजय तायडे या विद्यार्थिनीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना-वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन व निवासाची सोय व्हावी म्हणून रोख रक्कम आधार संलग्न बँक खात्याद्वारे देण्यात आली आहे.

जिंतूर तालुक्यातील करवली येथील भारत स्वयंसहायता बचतगटाच्या शिल्पा रवी मानवते यांना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील स्वयंसहायता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा योजनेअंतर्गत वाटप करण्यात आले. वडगाव सुक्रे येथील वैशाली नाना हातागळे यांना ऊसतोड कामगार म्हणून ओळखपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

मानवत तालुक्यातील कुंभारी येथील घनश्याम मधुकर रणखांबे यांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत चार एकर जिरायत शेतजमिनीचे वाटप समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले. गंगाखेड येथील गणपती यादव सवराते यांना हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जोडणारा जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनाचा लाभ म्हणून 78 लाख 51 हजार 765 रुपयांचा धनादेश उपविभागीय अधिकारी (भूसंपादन) यांच्यामार्फत देण्यात आला.

परभणी शहरातील मंगलमूर्ती नगरातील रहिवाशी श्रीपादराव प्रल्हादराव झांबरे यांना प्रधानमंत्री आवास योजना “सर्वांसाठी घरे” या योजनेअंतर्गत महानगरपालिकेमार्फत 2 लाख 50 हजार रुपये लाभाची रक्कम देऊन घरकुल बांधकाम कार्यारंभ आदेश प्रमाणपत्र देण्यात आले. विकास प्रभाकर धापसे यांना रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत नगर परिषद सेलू यांच्याकडून घराची चावी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, परभणी यांच्याकडून पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील मीना भुजंग काळे यांना स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत धनादेश देण्यात आला. तसेच परभणी तालुक्यातील लोहगाव येथील गौरी बालाजी घोरवांड यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत मोफत हृदय शस्त्रक्रिया प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाकडून वितरीत करण्यात आले.

जिंतूर तालुक्यातील मानकेश्वर येथील राजेश कठाळू कऱ्हाळे यांना शबरी आवास योजना (ग्रामीण) योजनेअंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कार्यालयाकडून 1 लाख 50 हजार अनुदानाची रक्कम देत घराची चावी दिली. जिंतूर तालुक्यातील करवली येथील तानाजी साहेबराव घाटुळ यांना स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) जिंतूर कार्यालयाकडून योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय अनुदानापोटी 12 हजार रुपये अनुदान देण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून साखला प्लॉट परिसर, परभणी येथील भाग्यश्री रवी गायकवाड यांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत 5 हजाराचा तीन टप्यात लाभ लाभार्थीच्या बँक खात्यामार्फत देण्यात आला.

अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सोन्ना येथील मीराबाई ज्ञानेश्वर आतमवाड यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत  पाथरगव्हाण येथील अभिमान मरिबा ढवळे यांना सिंचन विहीर देण्यात आली.

जिल्हा कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत सोन्ना येथील उषा रावसाहेब देशमुख यांना ट्रॅकर देण्यात आले. मानवत तालुक्यातील कोथळाच्या कमल मोतीलाल जोहरुले यांना श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजने अंतर्गत निवृत्ती वेतन मंजूर केल्याबाबतचे प्रमाणत्र देण्यात आले.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र परभणी यांच्यामार्फत शहापूर येथील बाबाराव दशरथ ढवळे आणि धर्मापुरीच्या लक्ष्मण संतुकराव चट्टे यांना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत अनुक्रमे 2 लाख 50 हजार  रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here