Dhananjay Munde : बीड जिल्ह्याला शरद पवारांनी काय दिलं हा प्रश्नच, धनंजय मुंडे यांचा बीडच्या सभेतून थेट सवाल

Dhananjay Munde : बीड जिल्ह्याला शरद पवारांनी काय दिलं हा प्रश्नच, धनंजय मुंडे यांचा बीडच्या सभेतून थेट सवाल

बीड : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये झालेल्या सभेत बोलताना २७ तारखेची ही सभा १७ तारखेच्या सभेची उत्तर सभा नाही, असं म्हटलं. बीड जिल्ह्याच्या विकासाच्या उत्तरदायित्त्वाची सभा आहे. १७ तारखेच्या सभेत सांगितलं की बीड जिल्ह्यानं आदरणीय साहेबांवर फार प्रेम केलं. प्रेम केलं पण त्या प्रेमाच्या पोटी साहेबांनी बीड जिल्ह्याला काय दिलं हा सवाल आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटचालीत भाजपला दिलेल्या २०१४ च्या पाठिंब्याचा मुद्दा धनंजय मुंडे यांनी काढला. २०१७ च्या चर्चांचा देखील दाखला धनंजय मुंडे यांनी दिला. धनंजय मुंडे यांनी या सभेत जितेंद्र आव्हाड यांचं नाव न घेता टीका केली.

धनंजय मुंडे काय म्हणाले?

साहेबांचं उत्तरादायित्व विकासाच्या माध्यमातून बीड जिल्ह्याला कुणी दिलं असेल ते अजित पवार यांनी दिलं. त्यामुळं ही सभा उत्तर सभा नाही तर उत्तरदायित्व सभा आहे. ही सभा बीड जिल्ह्याच्या अस्मितेची सभा आहे. बीड जिल्ह्याचा दुष्काळ संपवण्याची सभा आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
Weather Forecast: राज्यासाठी गुड न्यूज, मान्सूनबाबत महत्त्वाची बातमी आली, पुढील सहा दिवस पाऊस…
बीड जिल्ह्याच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्यातील फार अपेक्षा पूर्ण केल्यानं तुम्हाला एकच वादा अजितदादा असं म्हणतात, असं धनंजय मुंडे म्हणाले. गोपिनाथ मुंडे यांच्या नावानं महामंडळं निघाली. अजित पवार यांनी निर्णय घेईपर्यंत ती नावाला होती. माझ्या विनंतीनंतर तुम्ही या राज्याचं वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून गोपिनाथ मुंडे ऊस तोड कल्याण मंडळाला एका टनामागं १० रुपये देण्याचा निर्णय घेतला, असं धनंजय मुंडे म्हणाले. या निर्णयासाठी अभिनंदन करतो, असं देखील मुंडे म्हणाले.
Pune Special Train: आनंदाची बातमी: गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना पुण्यातून ३ विशेष रेल्वे, संपूर्ण वेळापत्रक
१७ तारखेच्या पूर्वसंध्येला माझा इतिहास विचारला. इतिहास विचारताना सांगितलं की या जिल्ह्यातील मंत्र्यानं तो इतिहास बीड जिल्ह्याला सांगावा. शेवटी माझ्यासाठी ते देव आहेत, दैवत आहेत. दैवतानं आज्ञा केली तर मान्य करणं बीड जिल्ह्याला मान्य आहे की नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले.भाजपमध्ये असताना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली होती, त्यावेळी २ मतं अजित पवार यांनी आणून दिली होती तो उपकार मी विसरू शकत नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले. माझा इतिहास बीड जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे. स्वर्गीय धनंजय मुंडे यांच्या हाताला धरुन संघर्ष केला, असं मुंडे यांनी म्हटलं.

Raj Thackeray: कोकणी जनतेला सल्ला, पेव्हर ब्लॉकवरुन वाभाडे, रट्टे देण्याचा इशारा, राज ठाकरेंचे सरकारला खडेबोल

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here