माझ्याशी संबंध ठेव, नाही तर आयुष्य संपवेन! मृत्यूच्या दिवशी सुधीर मोरेंना महिलेचे ५६ कॉल्स

माझ्याशी संबंध ठेव, नाही तर आयुष्य संपवेन! मृत्यूच्या दिवशी सुधीर मोरेंना महिलेचे ५६ कॉल्स

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: माजी नगरसेवक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुधीर मोरे यांच्या आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या वकील अॅड. नीलिमा सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावला. त्यामुळे त्या आता अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.

Sudhir More: रेल्वे ट्रॅकवर झोपण्यापूर्वी सुधीर मोरे फोनवर त्या महिलेशीच बोलत होते, CCTV फुटेज हाती

मोरे यांनी १ सप्टेंबर रोजी घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ लोकलसमोर झोकून देत आत्महत्या केली होती. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली कुर्ला रेल्वे पोलिसांनी एफआयआर नोंदवल्याने नीलिमा यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. आपल्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात आले असून, एफआयआरमधील तपशीलही अत्यंत संदिग्ध आहे, असा दावा निलिमा यांनी अॅड. सुबीर सरकार यांच्यामार्फत केला. ‘आरोपी निलीमा यांना मुंबई महापालिकेची निवडणूक लढवायची होती आणि तिकीट मिळण्यासाठी त्या माझ्या वडिलांवर दबाव आणत होत्या’, असे म्हणणे मोरे यांचे पुत्र व तक्रारदार समर यांनी अॅड. अनिल जाधव यांनी मांडले. अखेरीस सर्व बाजू ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजा सासणे यांनी निलिमा यांचा अर्ज फेटाळून लावला. आदेशाची सविस्तर प्रत नंतर उपलब्ध होणार आहे.

Sudhir More: रात्री एक फोन आला अन् रेल्वे ट्रॅकवर जाऊन आयुष्य संपवलं, ठाकरेंच्या शिलेदाराचं टोकाचं पाऊल का?

‘५६ दूरध्वनी कॉल’

‘मोरे व आरोपी यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद होते. माझ्याशी संबंध ठेवले नाही आणि माझ्याशी बोलणे थांबवले तर मी माझे आयुष्य संपवेन, अशी धमकी आरोपी नीलिमा यांनी मोरे यांना दिली होती. ज्या दिवशी मोरे यांनी आपले आयुष्य संपवले, त्या दिवशीही दोघांमध्ये ५६ फोन कॉल झाले. आपला छळ थांबवण्याची विनंती मोरे यांनी आरोपीला केली. तरीही मोरे टोकाचे पाऊल उचलत असतानाही आरोपीने त्यांच्याशी फोनवर बोलत छळवणूक सुरूच ठेवली होती असे दिसते. म्हणून कोठडीतील चौकशी आवश्यक आहे आणि आरोपीच्या आवाजाचा नमुनाही घ्यायचा आहे. तसेच आरोपीचा मोबाइल जप्त करून तपशीलही मिळवायचा आहे’, असे म्हणणे सरकारी वकील इक्बाल सोलकर यांनी पोलिसांतर्फे मांडले.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here