ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिकांचं प्लॅनिंग, स्वागताला २१ जेसीबी आणले पण परत पाठवले कारण…

ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिकांचं प्लॅनिंग, स्वागताला २१ जेसीबी आणले पण परत पाठवले कारण…

नांदेड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज हिंगोली मध्ये सभा पार पडणार आहे. या सभेसाठी उद्धव ठाकरे हे मुंबईहून नांदेड विमानतळावर दाखल होऊन हिंगोलीला पोहोचले आहेत. नांदेडमध्ये शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी जंगी प्लॅनिंग केलं होतं. शिवसैनिकांनी केलेल्या संपूर्ण प्लॅनिंगवर पोलिसांच्या एका निर्णयानं पाणी फेरलं. यामुळं शिवसैनिकांचा हिरमोड झाला. नांदेडमधील शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांनी राजकीय दबावातून असा निर्णय घेतला गेल्याची टीका केली आहे.

शिवसैनिकांची जंगी स्वागताची तयारी पण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज हिंगोलीत सभा होणार आहे. यासभेला नांदेडमार्गे जाण्यासाठी उद्धव ठाकरे नांदेड विमानतळावर येणार होते. त्यामुळं शिवसैनिकांकडून ठाकरेंच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली होती. नांदेडच्या शिवसैनिकांनी ठाकरेंच्या स्वागतासाठी २१ जेसीबी आणण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी याला परवानगी न दिल्यानं शिवसैनिकांना वेगळा निर्णय घ्यावा लागला.

जेसीबी परत पाठवण्याची वेळ

पोलिसांनी ठाकरेंच्या स्वागतासाठी आणलेल्या जेसीबींच्या वापराला परवानगी न दिल्यानं शिवसैनिकांना सर्व जेसीबी माघारी पाठवावे लागले. पोलिसांनी विमानतळाबाहेरील जेसीबीद्वारे करण्यात येणाऱ्या स्वागताला परवानगी नाकारली. यामुळं जेसीबी परत पाठवण्यात आले.
Nitin Desai: नितीन देसाई मातोश्रीवर उद्धव ठाकरेंकडे मदत मागण्यासाठी गेले होते, पण… प्रवीण दरेकरांचा दावा

दबावामुळं परवानगी नाकारल्याचा आरोप

नांदेडमधील शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांनी राजकीय दबावातून परवानगी नाकारण्यात आल्याचा दावा केला. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील नांदेड विमानतळावर येणार आहेत. याच कारणातून परवानगी नाकारल्यात आल्याचा आरोप शिवसेनेने सहसंपर्क प्रमुख प्रकाश मारावार यांनी केला आहे.
फ्रीजमागून विचित्र आवाज, टॉर्च लावून पाहिलं तर भलामोठा अजगर, पाहताच कुटुंबीयांच्या किंचाळ्या

उद्धव ठाकरे हिंगोलीत दाखल

उद्धव ठाकरे यांची हिंगोलीत सभा होणार आहे. या सभेसाठी उद्धव ठाकरे सभा स्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, पावसानं सभास्थळी हजेरी लावल्यानं शिवसैनिकांनी डोक्यावर खुर्च्या धरल्या होत्या. आता आजच्या हिंगोलीतील सभेत ठाकरेंच्या निशाण्यावर कोण असणार हे पाहावं लागेल. उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या संतोष बांगर आणि खासदार हेमंत पाटील यांच्यावर ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे.

मोठी बातमी! दीड महिना भाविक खंडेरायाच्या दर्शनापासून वंचित राहणार, जेजुरीचा गाभारा बंद

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here