त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना धक्काबुक्की; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरक्षारक्षकांना समज

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना धक्काबुक्की; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुरक्षारक्षकांना समज

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वर मंदिरात वाशिम येथून आलेल्या कावडधारकांना मंदिर सुरक्षारक्षकांनी धक्काबुक्की केल्याची चित्रफीत समाजमाध्यमांमध्ये झळकली. यानंतर संबंधित सुरक्षारक्षकांना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून भविकांसोबत नम्रतेने वागावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. वादाचे प्रसंग टाळायचे असल्यास परंपरा माहिती असणारे सुरक्षा कर्मचारी नेमावेत, अशी मागणी भाविकांकडून केली जात आहे.

देवस्थान ट्रस्टने महाराष्ट्र सुरक्षा बल या संस्थेचे रोजंदारीवर घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी कावडधारक भाविकांशी शुक्रवारी सायंकाळी अरेरावी करीत, धक्काबुक्की केली. यामध्ये सुरक्षारक्षक आणि भाविकांमध्ये झालेल्या संवादातून काही गैरसमज होऊन वाद झाला. यामुळे वातावरण तापले आहे. सुरक्षारक्षकांना सूचना देत भाविकांशी नम्रतेने वागावे असे बजावल्याची प्रतिक्रिया त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त कैलास घुले यांनी ‘मटा’शी बोलताना दिली.

त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी


…यामुळे होते अडचण

महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांचा सैनिकी पोषाख असल्याने भाविकांना हे कर्मचारीच वाटतात

भाविकांना भाषेची अडचण असल्याने ते सशुल्क तिकीटबारीत उभे राहतात. त्यांना मोफत दर्शनाची कल्पनाच नसते

सणवाराला ग्रामस्थ दर्शनासाठी येतात तेव्हा त्यांना वेळेची मर्यादा दाखवून अडवण्यात येते

दर्शनासाठी आलेल्या भाविकांना सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून आपुलकीची वागणूक मिळत नाही

Monsoon 2023: दुष्काळाचे सावट गडद, वाळलेला चारा संपला, पाण्यासाठीही मागवले टँकर; बळीराजा संकटात

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here