कात्रज चौकातील वाहतूक कोंडी जैसे थे; दीड वर्षात फक्त खांबच उभे, पूल वेळेत होणार का? पुणेकरांचा प्रश्न

कात्रज चौकातील वाहतूक कोंडी जैसे थे; दीड वर्षात फक्त खांबच उभे, पूल वेळेत होणार का? पुणेकरांचा प्रश्न

म. टा. प्रतिनिधी, पुणे: एनडीए चौकातील (चांदणी चौक) उड्डाणपूल प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन तो पूल आता दिमाखात उभा असताना, राष्ट्रीय महामार्गाचाच एक भाग असलेल्या कात्रज चौक (वंडरसिटी) ते राजस सोसायटीदरम्यानचा उड्डाणपूल मात्र अद्याप समस्यांच्या विळख्यात आहे. या उड्डाणपुलाचे काम गेले सहा महिने ठप्प आहे. मार्च २०२३मध्ये या कामाचे आठ ते दहा खांब सार्वजनिक बांधकाम विभागाने उभे केले. गेल्या सहा महिन्यांत केवळ दोन खांबांची भर पडली आहे. उड्डाणपुलाच्या कामाची मुदत फेब्रुवारी २०२४मध्ये संपुष्टात येणार असून, कामाचा आजवरचा वेग पाहता तो पुढील सहा महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.

काम कमी; रखडपट्टीच जास्त

कात्रज चौकातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’कडून वंडरसिटी ते कात्रज-कोंढवा रस्त्यावरील राजस सोसायटी चौकापर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या कामाचे भूमिपजून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २४ सप्टेंबर २०२१ रोजी झाले होते. प्रत्यक्षात फेब्रुवारी २०२२मध्ये कार्यादेश देण्यात आले. मात्र, तेव्हापासून सुरू झालेल्या कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही.

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, चांदणी चौकातील पूल वाहतुकीसाठी खुला होणार

केवळ खांबांचीच उभारणी

उड्डाणपुलाच्या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. आता दीड वर्षे उलटली, तरी केवळ खांबांचीच उभारणी झाली आहे. उड्डाणपुलासाठी आवश्यक स्पॅनची निर्मिती करण्यात येत असली, तरीही ते जोडणीच्या दृष्टीने हालचाल सुरू नसल्याचे दिसून येते. त्यामुळे मुदतीत काम पूर्ण होणार का, असा प्रश्न आहे.

पुलाची एक मार्गिका बंदच

कात्रज तलाव भरल्यानंतर पाणी वाहून जाण्यासाठी राजस सोसायटी चौकाजवळ नैसर्गिक प्रवाह आहे. तेथे कल्व्हर्टचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेला कात्रज बसथांबा ते राजस सोसायटी या दरम्यानच्या पुलाची एक मार्गिका काही महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे कात्रजकडे जाणारी वाहतूक उड्डाणपुलाखाली अरुंद रस्त्यावरून सुरू असून, तेथे सिग्नल लागल्यानंतर वाहनांच्या रांगा लागतात.

कामाला गती नाहीच

भविष्यातील गरज ओळखून नितीन गडकरी यांनी कात्रज-कोंढवा रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल उभारण्याची सूचना केली होती. त्यानुसार सर्व्हे करण्यासाठी काही कालावधी गेला. त्यानंतर साधारण उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्गाच्या रुंदीकरणासाठी भूसंपादन प्रक्रियेला लागलेल्या विलंबामुळे कामाची गती मंदावली. त्यानंतरही कामाने गती पकडली नाही.

२५ सप्टेंबर २०२१

उड्डाणपुलाच्या कामाचे भूमिपूजन

फेब्रुवारी २०२२

उड्डाणपुलाचा कार्यादेश जारी

उड्डाणपूल महत्त्वाचा का?

– उड्डाणपुलामुळे देहूरोड बाह्यवळण रस्त्याने सोलापूरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कोंढव्याकडे जाणे सोयीचे होणार.

– कात्रज चौकातील वर्दळ प्रत्यक्षात कमी होणार असल्याने पीएमपी बसथांबा, भाजी मंडई येथे लागणाऱ्या वाहनांच्या रांगा कमी होण्यात मदत.

– पीएमपी थांब्यावर बस आणि प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही.

बायकोनेही एवढे किस केले नव्हते…; अजित पवारांचा विनोद, अन् बारामतीकरांना हसू आवरेना

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here