नियतीचा खेळ! कमी वयात कुटुंबाचा गाडा ओढला; ८ महिन्यांपूर्वीच लग्न, पण कामावर जातानाच घडला अनर्थ, अन्…

नियतीचा खेळ! कमी वयात कुटुंबाचा गाडा ओढला; ८ महिन्यांपूर्वीच लग्न, पण कामावर जातानाच घडला अनर्थ, अन्…

सोलापूर: शहरातील नई जिंदगी परिसरात युवकाला सिमेंटच्या मिक्सर वाहनाने चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गौस रफिक नदाफ (२३, रा. कुर्बान हुसेन नगर, सोलापूर) असे युवकाचे नाव आहे. शनिवारी सकाळी गौस हा कामाला जाण्यासाठी घाई गडबडीत दुचाकी वाहनावर निघाला होता. कमी वयातच कुटुंबाची जबाबदारी आलेल्या युवकाला शनिवारची सकाळ शेवटची सकाळ ठरली. दुचाकी वाहनावर जाताना कुत्रं आडवा आला त्याला वाचवण्यासाठी गौसने दुचाकीला अचानक ब्रेक मारला. पाठी मागून येणाऱ्या सिमेंटच्या मिक्सर वाहनाने गौस नदाफ या युवकाला जबर धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, गौसच्या पोटावरुन बलकरचा चाक गेले.
गरोदर बहिणीला डॉक्टरकडे घेऊन जात होता; रस्त्यात रेड्याने दिली दुचाकीला धडक, अन्…
या अपघातात गौस नदाफ हा युवक जागीच गतप्राण झाला. नई जिंदगी चौकाच्या मुख्य रस्त्यावर अपघात झाल्याने मोठी गर्दी झाली होती. गर्दीतील काही युवकांनी सिमेंटच्या मिक्सर वाहन चालकाला चोप दिला. गौस नदाफ याने कमी वयातच कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी स्वतःवर घेतली होती. नव्या घरांना पेंटिंगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. गौसचे वडील हे देखील पेंटिंगचे काम करत होते. परंतु अर्धांगवायूचा झटका आल्याने अनेक दिवसांपासून रफिक नदाफ घरीच होते. वृद्ध आई असल्याने आठ महिन्यांपूर्वी गौसचे लग्न झाले होते. रोजंदारीवर पेंटिंगचे काम करून गौस हा युवक सुखी संसारात होता. शनिवारी सकाळी गौसच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गौसच्या आई वडिलांना त्याच्या मृत्यूची माहिती देण्यासाठी कुणीही पुढे जात नव्हता.

लातूर-नांदेड महामार्गावरील घटना ट्रक आणि बसची समोरासमोर धडक, सहा प्रवासी गंभीर

गौस नदाफ हा नई जिंदगी, कुर्बान हुसेन परिसरात पेंटर म्हणून प्रसिद्ध झाला होता. विश्वासू पेंटर म्हणून त्याची ओळख निर्माण झाली होती. मित्रांसोबत देखील मोठ्या मनाने राहत होता. त्याच्या अपघाताची आणि मृत्यूची वार्ता प्राप्त होताच मित्रांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करताच गौसच्या मित्रांनी शासकीय रुग्णालयात हंबरडा फोडला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून बलकर चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here