लोकसभा निवडणुकीला उभे राहणार की नाही? उदयनराजे भोसले म्हणाले, लोकांचा आग्रह असतो पण…

लोकसभा निवडणुकीला उभे राहणार की नाही? उदयनराजे भोसले म्हणाले, लोकांचा आग्रह असतो पण…

सातारा : शरद पवारांनी बारामतीत अजित पवारांबद्दल केलेले वक्तव्य आणि साताऱ्यातील सभेत घेतलेला युटर्न याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांना विचारले असता त्यांनी पवार साहेब काय बोलले ते त्यांनाच विचारा, दुसऱ्याच्या बाबतीत मी काय बोलू शकतो. मी काय अंतर्ज्ञानी नाहीये.. असे सांगत पवारांच्या प्रश्नाला बगल दिली.

सातारा शहरातील विकासकामांची पाहणी उदयनराजे भोसले यांनी केले त्यावेळी ते अजिंक्यतारा किल्ल्यावर माध्यमांशी बोलत होते.अजिंक्यतारा किल्ल्याच्या रस्त्याच्या कामाबाबत उद्घाटन करण्यापासून कोणी कोणाला रोखलेले नाही. मात्र, कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्टर सारखे काम करावे. मी कोणत्याही श्रेय वादात पडत नाही, पण जो पत्रव्यवहार शासनासोबत झालाय तो कोणी केलाय तो पहावा, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

उदयनराजे म्हणाले, गड किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत संबंधित मंत्र्यांबरोबर एक बैठक होणे गरजेचे आहे. टुरिझम वाढवण्याच्या दृष्टीने जे काही करावे लागेल ते आम्ही करणार आहे. सातारा लोकसभा उमेदवारीबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य करणे टाळले आहे. लोकसभा निवडणुकीला उभे राहणार की नाही? हे सगळे आता उघडकीस केले तर कसे होणार. लोकांचा आग्रह पण असतो तोही लक्षात घेतला पाहिजे असे सांगत २०२४च्या लोकसभा उमेदवारी राजेंनी गुलदस्त्यात ठेवली आहे.

नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात सखोल चौकशी होईल याची खात्री आहे.महापुरुषांच्या होत असलेल्या अवमानाबाबत कायद्यात बदल होणे गरजेचे आहे. साताऱ्यात मागे घडलेल्या घटनेबाबत पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. आठवडाभर वाट पाहूयात, मग पुढील निर्णय घेऊ.

रोहित पवार यांनी काल दहिवडी येथील सभेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर दुष्काळी भागात त्यांनी दौरा केला नाही, असा त्यांना ठपकाच ठेवायचा असेल तर मी काय बोलणार. जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली, त्यावेळेस शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दुष्काळी परिस्थितीबाबत सूचना दिल्या आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी १५ ऑगस्ट रोजी सातारा शहरातील कामांची पाहणी केली.यावर उदयनराजे यांनी मी काम केलेत म्हणूनच सर्वजण ही कामे पाहत आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान प्रकरणी उदयनराजे पोलीस अधीक्षकांच्या भेटीला

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here