व्यापारी संकुलातील गाळे वाटपाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करावी – मंत्री छगन भुजबळ

व्यापारी संकुलातील गाळे वाटपाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करावी – मंत्री छगन भुजबळ

नाशिक,दि.: 26 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्तसेवा): येवला शहरातील व्यापारी संकुलाच्या गाळ्यांचे शेवटच्या टप्प्यातील तांत्रिक काम तातडीने पूर्ण करून व्यापाऱ्यांना गाळे वाटपाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करावी अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

आज येवला येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसिलदार आबा महाजन, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, नगर अभियंता भालचंद्र क्षिरसागर, नगरपालिका प्रशासकीय अधिकारी गोविंद गवंडे, अभियंता पी. डी. जाधव यांच्यासह नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुजबळ यावेळी म्हणाले की, व्यापारी संकुलातील गाळ्यांची तांत्रिक व अनुषंगिक दुरूस्तीची कामे मोहिम स्तरावर पूर्ण करण्यात यावीत. गाळे वाटप करतांना विस्थापित गाळे धारकांना प्रामुख्याने प्राधान्य देण्यात यावे अशा सूचना त्यांनी बैठकीत

उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

 

000000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here