भयंकर…! आधीचा राग डोक्यात; भाऊ समोर दिसताच चढला पारा, अन् घडलं धक्कादायक कृत्य

भयंकर…! आधीचा राग डोक्यात; भाऊ समोर दिसताच चढला पारा, अन् घडलं धक्कादायक कृत्य

बारामती: इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत भावानेच भावाचा कोयत्याने वार करून खून केला असून त्यानंतर मृतदेह विहिरीत फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. इंदापूर तालुक्यातील कळंब गावात ही घटना घडली आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
तरुणाने अचानक सोडलं घर; सगळीकडे शोधाशोध, ७ दिवसांनंतर धक्कादायक दृश्य पाहून सगळेच हादरले
मिळालेल्या माहितीनुसार, हनुमंत सर्जेराव जाधव असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून दत्तात्रय हरिदास जाधव असे अटक करण्यात आलेल्या भावाचे नाव आहे. या घटनेने इंदापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. हनुमंत जाधव हे नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतातील वीज पंप सुरू करण्यासाठी निघाले असताना जनावरांना चारा टाकण्यासाठी थांबलेल्या दत्तात्रय हरिदास जाधव याने पूर्वीचा राग मनात धरून शेजारी ठेवलेला कोयता उचलला आणि थेट हनुमंत जाधव यांच्यावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यात हनुमंत जाधव हे गडबडून गेले. मात्र हल्लेखोर सपासप त्यांच्यावर वार करतच राहिला. अखेर त्यांचा या हल्ल्यात जागेवरच मृत्यू झाला.

मोटारसायकलसाठी मुलाची बायकोसह आत्महत्या; त्याच ठिकाणी बापानंही आयुष्य संपवलं

मात्र हल्लेखोराने रागाच्या भरात त्यांचा मृतदेह शेजारी असलेल्या विहिरीत फेकून दिला. त्यानंतर घटनास्थळावरून दत्तात्रय जाधव हे पळून गेले. मात्र याबाबत शेजारी असलेल्या नागरिकांना शंका आल्याने त्यांनी याबाबत तातडीने पोलिसांना कळवले. वालचंदनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांना आरोपींची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीला जवळ असलेल्या उसाच्या शेतातून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दत्तात्रय जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पुढील तपास वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक साळुंखे करीत आहेत.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here