मुंबईहून विमानानं रांचीला निघाला पण पोहोचलाच नाही, रक्ताची उलटी झाली अन् अनर्थ घडला

मुंबईहून विमानानं रांचीला निघाला पण पोहोचलाच नाही, रक्ताची उलटी झाली अन् अनर्थ घडला

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : हवाई प्रवासादरम्यान विमानात रक्ताची उलटी झाल्याने प्रवाशाचा मृत्यू झाला. मुंबई ते रांची या विमानाने सोमवारी प्रवास करत असताना प्रवाशाची प्रकृती बिघडली. त्यामुळे या विमानाचे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच प्रवाशाने जीव गमावाला. मृत्यू पावलेल्या प्रवाशाचे नाव देवानंद तिवारी (वय ६२) असे आहे.

देवानंद तिवारी हे इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक ६ई ५०९३ या विमानाने प्रवास करत होते. त्यांना मुत्रपिंडाचा आणि टीबीचा त्रास होता. प्रवासादरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना मोठ्या प्रमाणात रक्ताची उलटी झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. परिणामत: विमानाचे नागपूर येथे आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले. विमानाचं नागपूर विमानतळावर लँडिंग केल्यानंतर देवानंत तिवारी यांना पुढील प्रक्रियेसाठी विमानतळावर तैनात असलेल्या किम्स-किंग्ज्वे हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे नेण्यात आले, अशी माहिती किम्स-किंग्ज्वे हॉस्पिटलचे उपमहाव्यवस्थापक (ब्रॅण्डिंग अॅण्ड कम्युनिकेशन्स) एजाज शमी यांनी दिली.
फक्त ८ मिनिटांत भारताचा आशिया कपचा संघ का बदलला, रोहित शर्मावर ओढवली नामुष्कीची वेळ…

काही दिवसांपूर्वी नागपूर विमानतळावर वैमानिकाचा मृत्यू

नागपूर विमानतळावर १७ ऑगस्टला एका वैमानिकाचा टेक ऑफ पूर्वी मृत्यू झाला होता. तो वैमानिक इंडिगो एअरलाइन्सचा होता. कॅप्टन मनोज सुब्रमण्यम असं त्याचं नाव होतं. तो नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या विमानाचं टेक ऑफ करणार होता. विमानतळावरील बोर्डिंग गेटजवळ अचानक ते कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. ह्रदयविकाराचा धक्का आल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्या घटनेनंतर विमानतळावर खळबळ उडाली होती.

Ajit Pawar : शरद पवारांच्या खेळीला पुतण्या अजितदादांचं चोख प्रत्युत्तर; बीडमध्ये लवकरच नवा पक्षप्रवेश?

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनरच्या धडकेत गाड्यांचा चक्काचूर; दोघांचा जागीच मृत्यू, पाचजण जखमी

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here