‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयात विविध कार्यक्रम संपन्न

‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयात विविध कार्यक्रम संपन्न

अमरावती, दि. 14 : स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सवांतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’  हे अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. मातृभूमि विषयी प्रेम, साक्षरता व जनजागृती निर्माण होऊन देशभक्तीची जाज्वल्य भावना जनमानसात रूजावी यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात सेल्फी पॉईंट, वृक्षारोपण व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आयोजित कार्यक्रमांत स्वत: सहभागी होऊन  कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला. देशभक्ती, देशप्रेमाची भावना प्रत्येक जनमानसात जागृत होण्यासाठी संदेशांचा प्रचार-प्रसार करण्यात आला.

‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर ‘भू मातेस नमन, वीरांना वंदन’ नावाचा सेल्फी पॉईंट उभारण्यात येऊन सेल्फी घेऊन मातृभूमीच्या संरक्षणार्थ बलिदान दिलेल्या वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्तासह इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सेल्फी घेऊन अभियानात सहभाग नोंदविला.

दुपारच्या सत्रात ‘मेरी माटी मेरा देश’ व ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या विषयावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या विषयावर आधारित दिड तासाच्या वेळेत रांगोळी काढवयाची होती. त्यात आयुक्त कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतला. स्पर्धेअंती परीक्षंकाकडून रांगोळींची पाहणी करुन प्रथम, व्दितीय, तृतीय व प्रोत्साहनपर बक्षीसे मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना वितरीत करण्यात आले.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय, उपायुक्त संजय पवार, संतोष कवडे, रमेश आडे, सहायक आयुक्त श्यामकांत मस्के यांनी अक्ष्यक्ष म्हणून भूमिका पार पाडली. वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार, तहसीलदार भाग्यश्री देशमुख, सहायक निबंधक स्वाती गुडधे यांनी परीक्षकांचे काम पाहीले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तहसीलदार वैशाली पाथरे, संतोष काकडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी पार पडण्यासाठी नायब तहसीलदार शुभांगी चौधरी, मधुकर धुळे, श्याम देशमुख, प्रशांत अडसुळे, संदीप टांक, अतुल लवणकर, प्रशांत वैद्य आदींनी परिश्रम घेतले.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here