‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत विभागीय आयुक्तांकडून विविध ठिकाणी वृक्षारोपण

‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत विभागीय आयुक्तांकडून विविध ठिकाणी वृक्षारोपण

अमरावती, दि. 11 : स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सवांतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’  हे अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. मातृभूमि विषयी प्रेम, साक्षरता व जनजागृती निर्माण होऊन देशभक्तीची जाज्वल्य भावना जनमानसात रूजावी हा या अभियानाचा उद्देश आहे. सर्वांनी या अभियानात स्वयंस्फुर्तीने सहभाग घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे केले. अभियानांर्तगत जिल्हा परिषदेच्या परिसरात व महापौर बंगल्यात डॉ. पाण्डेय यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिकेचे आयुक्त देविदास पवार, महिला व बालविकास उपायुक्त कैलाश घोडके यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

या अभियानांतर्गत सुरुवातीला ‘विरो का सन्मान’ अंतर्गत जिल्हा परिषेदेच्या परिसरातील स्वातंत्र्य संग्राम सेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्यास हारार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करुन हातात माती घेऊन उपस्थितांना ‘पंचप्रण’ शपथ देण्यात आली. तसेच याठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे सुध्दा विभागीय आयुक्तांच्या उद्घाटन करण्यात आले.

दुसऱ्या कार्यक्रमात महानगरपालिकातर्फे आयोजित ‘एक घर, एक वृक्ष’ अंतर्गत विभागीय आयुक्‍त डॉ. पाण्‍डेय व महापालिका आयुक्त श्री. यांच्‍या हस्‍ते महापौर यांच्या बंगल्यात तसेच चिलम छावणी व विद्यापीठ रोड  याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. याठिकाणी 50 फळझाडे लावण्यात आली. महापालिकेच्या या स्तुत्य उपक्रमाबाबत विभागीय आयुक्तांनी कौतूक केले.

यावेळी शहर अभियंता इकबाल खान, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, सिस्‍टीम मॅनेजर अमित डेंगरे, उद्यान अधिक्षक श्रीकांत गिरी यांच्या हस्‍ते सुध्‍दा वृक्षारोपण करण्‍यात आले. यावेळी निरीक्षक मुकेश खारकर मनपा कर्मचारी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते

000

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here