पोषण अभियान कार्यक्रमाच्या केंद्र व राज्य हिश्श्याच्या झालेल्या बदलाप्रमाणे राज्यात अंमलबजावणीस मान्यता

पोषण अभियान कार्यक्रमाच्या केंद्र व राज्य हिश्श्याच्या झालेल्या बदलाप्रमाणे राज्यात अंमलबजावणीस मान्यता

मुंबई, दि.१८: पोषण अभियान या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाच्या केंद्र व राज्य हिश्श्याच्या प्रमाणात झालेल्या बदलाप्रमाणे  पोषण अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती  महिला व बालविकास विभागाने दिली.

          सन 2018-19 या आर्थिक वर्षापासून राज्यात राबविण्यात येणारा पोषण अभियान हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रम केंद्र शासनाने पोषण 2.0 अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात राबविण्यास मान्यता देण्यात आली.

          तसेच केंद्र पुरस्कृत पोषण अभियान हा कार्यक्रम सुधारित केंद्र हिस्सा 60 % व राज्य हिस्सा 40% या प्रमाणात राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

          त्याकरिता पूरक मागणीद्वारे प्राप्त झालेला अतिरीक्त नियतव्यय उपयोजनात आणण्यास मान्यता देण्यात आली, अशी माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे.

००००

संध्या गरवारे/विसंअ

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here