बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध – महासंवाद

बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध – महासंवाद




मुंबई, दि. 10 : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेश पत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या  या संकेतस्थळावर शुक्रवार दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी ‘ऍडमिट कार्ड’ या लिंक द्वारे डाऊनलोड करण्याकरिता उपलब्ध होतील, असे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक / प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना याबाबत सूचित करण्यात आले आहे. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत करण्यात आले आहे.

00000

बी.सी.झंवर/व.स.सं







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here