आंधळी उपसा सिंचन योजनेचे काम मुदतीत पूर्ण करावे – मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद

आंधळी उपसा सिंचन योजनेचे काम मुदतीत पूर्ण करावे – मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद




सातारा दि.२८: आंधळी उपसा सिंचन योजनेमुळे माण तालुक्यातील गावांमधील शेतीच्या सिंचनासह पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. उपसा सिंचन योजनेचे काम मुदतीत पूर्ण करावे, असे निर्देश ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले. 

माण तालुक्यातील आंधळी उपसा सिंचन योजनेच्या कामाची पाहणी ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी केली. याप्रसंगी केंद्रीय जल आयोग पाणी प्रकल्प सदस्य नवीन कुमार, पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हणमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता अमोल निकम, विजय पाटील आदी उपस्थित होते.

गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारने मोठी मदत केली आहे. माण दुष्काळी तालुका आहे. जानेवारी महिन्यापासून या तालुक्यातील लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. आंधळी उपसा सिंचन योजना याअंतर्गतच येत असून हे काम पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या सुविधा निर्माण होणार आहेत. आंधळी उपसा सिंचन काम गुणवत्तापूर्ण व मुदतीत पूर्ण करावे, असेही मंत्री श्री. गोरे यांनी पाहणी दरम्यान सांगितले. 

जल आयोग पाणी प्रकल्प सदस्य श्री. कुमार यांनीही आंधळी उपसा सिंचन योजनेचे काम गतीने व गुणवत्ता पूर्ण करावे असे सांगितले. 

०००







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here