मुंबई, दि. 25 : भारताचे माजी प्रधानमंत्री दिवंगत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज (दि. २५) राजभवन येथे अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, राज्यपालांचे परिवार प्रबंधक जितेंद्र वाघ, राजभवनातील अधिकारी व कर्मचारी तसेच राजभवन येथे तैनात असलेले पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
०००