राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ ग्रंथाचे प्रकाशन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ ग्रंथाचे प्रकाशन

‘उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारांचे वितरण

मुंबई, दिनांक : २  महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा उद्या आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी उत्कृष्ट संसदपटू’ आणि ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम उद्या, ३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ३:३० ते ५ या वेळेत मध्यवर्ती सभागृह, विधानभवन, मुंबई येथे होणार आहे.

या कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here