बदनापूर येथील श्रीराम कथा कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

बदनापूर येथील श्रीराम कथा कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

जालना, दि. 30 (जिमाका) :- बदनापूर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्रीराम कथा कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली.

यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे,  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले की, येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन होत आहे. यामुळे संपूर्ण भारत पुन्हा राममय होतोय, ही आनंदाची गोष्ट आहे. बदनापूर येथे आयोजित श्रीरामकथेला भेट देण्याची संधी मिळाली, याचे खरोखर समाधान वाटत आहे. श्रीराम कथा ज्यांनी ऐकली तो खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये सुधार करू शकतो आणि जीवनात तारला जाऊ शकतो. ही रामकथा आपल्या सर्वांना ऐकायला मिळते, ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे.

प्रारंभी श्री. फडणवीस हे स्वत: टाळ वाजवत मंचावर आले. यावेळी पाच जेष्ठ वारकऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here