आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्यकेंद्रात प्रसूतीपूर्व कक्ष स्थापन करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्यकेंद्रात प्रसूतीपूर्व कक्ष स्थापन करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

नागपूर दि.18: नंदुरबार, पालघर, धुळे अशा आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या ठिकाणी प्रसूती पूर्व केंद्र स्थापन करावे. या कक्षात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्या अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

विधान भवन, नागपूर येथे आज उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण व आदिवासी समाजाच्या समस्या या विषयी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार आमषा पाडवी,  धीरज कुमार आयुक्त आरोग्य विभाग,  रुबल अग्रवाल सचिव महिला बाल कल्याण आणि दृकश्राव्यद्वारे सावन कुमार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह आरोग्य विभागाचे उच्च अधिकारी उपस्थित होते.

आदिवासी भागामध्ये बाल माता मृत्यचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्याची चांगली काळजी घेता यावी यासाठी प्रसूती पूर्व कक्ष उपयुक्त असल्याचे सांगून उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, गरोदर महिलांना प्रसूती पूर्वी किमान 10 दिवस आधी या कक्षामध्ये दाखल करावे. गरोदर मातांसह त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची व जेवणाची सोय असावी. प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ज्या ठिकाणी प्रसूतीपूर्व कक्ष आहे त्याची माहिती पोहचवावी. प्रसूतीमध्ये माता मृत्यू होण्याची जास्त शक्यता असलेल्या गावांची यादी तयार करून त्या गावांवर लक्ष केंद्रित करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, रिक्त पदे भरण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करावी. येणाऱ्या अडचणी आणि लागणाऱ्या सुविधा यांचा सविस्तर अहवाल सादर करावा. आयुर्वेदिक डॉक्टरांची पद भरती करावी. कंत्राटी भारतीचा प्रस्तावही लवकर सादर करावा. त्यास आरोग्य खात्याने तातडीने मंजुरी द्यावी. आरोग्य सेविका भरती प्रक्रिया जिल्हा परिषदेने लवकरात लवकर पूर्ण करावी. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची पूर्ण वेळ कर्मचारी भारती होण्यापूर्वी खाजगी तत्वावर भरती करून त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. यामध्ये ज्यांना अनुभव नसेल त्यांना जवळच्या रुग्णालयात प्रशिक्षण देण्यात यावे.प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला ज्या महिला दक्षता समिती आहेत त्या अद्ययावत करून त्याची दर महिन्याला आढावा बैठक घेतली जावी.बोट रुग्णवाहिका अद्ययावत आणि सुस्थितीत ठेवाव्यात त्याची वेळोवेळी पाहणी करावी. अक्कलकुवा येथील 30 बेड चे हॉस्पिटल लवकरात लवकर 50 बेड चे करावे. महिलांचे रुग्णालय तात्काळ सुरू करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

00000

 

हेमंतकुमार चव्हाण/स.सं.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here