प्रत्येकासाठी घर, रोजगार आणि आरोग्यदायी जीवनासाठी शासन कटिबद्ध – केंद्रीय मंत्री नारायण राणे

प्रत्येकासाठी घर, रोजगार आणि आरोग्यदायी जीवनासाठी शासन कटिबद्ध – केंद्रीय मंत्री नारायण राणे

नंदुरबार, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा): देशातील प्रत्येक वंचिताच्या जीवनात घर, रोजगार आणि आरोग्य देण्यासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले आहे.

ते आज तळोदा तालुक्यातील करदे येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रे’च्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत यादृष्टीने केंद्र शासनाने राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने  अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने, “विकसित भारत संकल्प यात्रा” ही  देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून राबवली  आहे. या यात्रेच्या माध्यमातून विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासोबतच या योजनांच्या माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण केली जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांच्या वैयक्तिक यशोगाथा, अनुभव शेअरिंगद्वारे त्यांचा फिडबॅक घेवून त्याबाबत सरकारला अवगत केले जाणार आहे. तसेच यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशीलांच्या आधारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी देखील केली जाणार आहे. तसेच या यात्रेचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व शाश्वत स्वरूपात व्हावा यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.

कार्यक्रमात विकसित भारत संकल्प यात्रेच्या दरम्यान सरकारी योजनांचा लाभ घेवून आपले जीवन समृद्ध केलेल्या लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच बचत गटांच्या माध्यमातून विकसित केलेल्या भरडधान्य प्रदर्शन व आरोग्य शिबिरास भेट देवून यावेळी केंद्रीय मंत्री श्री. राणे यांनी समाधान व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here